📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
रायगड

म्हसळा तालुक्यात शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू ; गौरी करडे यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

म्हसळा तालुक्यात शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू ; गौरी करडे यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

म्हसळा : मुकुंद बोर्ले

म्हसळा:काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली म्हसळा नगरपंचायत मधील नगराध्यक्ष सह नगरसेवकांचा मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून राजकीय भूकंप घडवला होता.पण त्यावेळी शांत बसतील असे खासदार सुनील तटकरे कसले त्यांनी सुद्धा म्हसळा तालुका शिवसेना तालुका प्रमुख, महिला कार्यकारणी सह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला. खासदार सुनील यांचा उपस्थितीत प्रवेश केलेल्या महिला तालुका आघाडीच्या गौरी करडे, संगीता सुर्यवंशी, नेहा पाटूकले, मोनिका कांबळे यांनी राष्ट्रवादी पक्षात योग्य सन्मान न मिळाल्याने पुन्हा स्वगृही जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.म्हसळा तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी माजी सभापती रवींद्र लाड,श्रीवर्धन मतदार संघ संपर्क प्रमुख सचिन पाटेकर, तालुका प्रमुख बाबू बनकर, अमोल पेंढारी, नगराध्यक्ष फरहीन बशारथ, महेश पाटील, प्रकाश रायकर, अक्रम साने, दीपेश जाधव, अमित महामुनकर, नदीम दफेदार, लहू तुरे, समीर धनसे, नगरसेविका सुमया अमदानी हे उपस्थीत होते.म्हसळा तालुक्यात शिवसेनेत मागील काही दिवसात जोरदार इंकमिंग सुरू झाल्याने आगामी जिल्हापरिषद निवडणूकपूर्वी शिवसेनेची ताकत वाढली आहे.

Back to top button