बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात शारदा विद्या मंदिर विजेता तर मुलीच्या गटात जयभवानीचा संघ विजेता

बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात शारदा विद्या मंदिर विजेता तर मुलीच्या गटात जयभवानीचा संघ विजेता
गेवराई दि. ३ ( प्रतिनिधी) जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात जयभवानी विद्यालयात घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मुलाच्या गटात शारदा विद्या मंदिरचा संघ विजेता तर मुलीच्या गटात जयभवानी विद्यालयाचा संघ विजेता ठरला.
शारदा स्पोर्ट्सचे अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये बॅडमिंटन स्पर्धेचे शुक्रवार दिनांक २ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलेले होते. शिवाजीनगर गढी येथील जयभवानी विद्यालयात या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, नगरसेवक गणेश रुकर यांच्या हस्ते बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन झाले या स्पर्धेमध्ये १८ शाळेचे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात मुलाच्या गटात शारदा विद्यामंदिरच्या संघाने विजेतेपद पटकावले. संघातील. हिंगे साईराज, हिंगे युवराज, पट्टे अनिरुद्र, शेजाळ ज्ञानेश्वर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. सर्व खेळाडूंना मुख्याध्यापक मुरलीधर पवार, माजी मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, सदानंद कुलकर्णी, किशोर चौधरी, नारायण चाळक, सतीश मस्के, भाग्यश्री आहेर, पूजा दाभाडे, क्रीडा शिक्षक अंगद पगळ यांचे मार्गदर्शन लाभले.
मुलीच्या गटामध्ये जयभवानी विद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघांतील किशोरी बारगजे दुर्गा वाघमारे, अदिती कानडे, संध्या रोमन
या खेळाडूंनी रोमहर्षक खेळी करत विजेतेपद मिळविले. त्यांना मुख्याध्यापक वसंत राठोड क्रीडाशिक्षक दिलीप धस, प्रा. कल्याण पडुळे, दादा तळेकर, सय्यद सुमेर, श्रीमती आशा वराट यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे पंच म्हणून आदित्य ससाने, हर्ष कुकडेजा, यश चंदनशिव, स्वराज सपकाळ, पृथ्वीराज नागरगोजे, अभिजित घारगे, कृष्णा वेदपाठक, श्रावणी गंगाधर, डॉ बाळासाहेब सरपते यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिके वितरित करणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजन रणवीर पंडित यांनी दिली. जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.



