८० कोटींच्या गटर योजनेची चौकशी होणार; प्रशासनाचे लेखी आश्वासन

८० कोटींच्या गटर योजनेची चौकशी होणार; प्रशासनाचे लेखी आश्वासन
राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट)उपोषण स्थगित
जामखेड : नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड गटर योजनेच्या कामात निकृष्ट व बोगस दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्याने संबंधित प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले.
तातडीने सुधारणा न झाल्याच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करण्यात आले. सुमारे दहा तास चाललेल्या उपोषणानंतर संबंधित ठेकेदाराचे साईट इंजिनिअर व जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लेखी आश्वासन देत राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट)उपोषण स्थगित करण्यात आले.पुढील १५ दिवसांत झालेल्या कामांची सखोल तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
तपासणीत निकृष्ट साहित्य आढळल्यास ते तत्काळ हटवून दर्जेदार साहित्य वापरण्यात येईल. तसेच सुमारे ८० कोटींच्या मलनिस्सारण भूमिगत गटर योजनेची कामे नियमानुसार व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
झालेल्या कामांची नागरिकांसमोर प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी
यावेळी राष्ट्रवादीचे नेते शहाजी राळेभात, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, राजेंद्र गोरे,प्रशांत राळेभात,इस्माईल सय्यद,बिभिषण (मामा) धनवडे,वसीम सय्यद,संदीप राळेभात, कुंडल राळेभात,इराफ कुरेशी यांच्यासह मंगेश आजबे, सागर सदाफुले,रमेश आजबे, अवधूत पवार, निखिल घायतडक,संजय डोके,वसीम शेख, नासिर चाचू सय्यद,अमोल गिरमे, अशोक घुमरे,जुबेर शेख, बिलाल शेख, आसिफ शेख, बजरंग डुचे, प्रविण माकुडे, अझहर खान,गणेश हगवणे,अनिल अडाले, सचिन शिंदे, सागर भोसले,अनिल अडाले,दिपक घायतडक, गणेश आजबे,बाळासाहेब खैरे, सलीम शेख,पै.सैफ शेख, दत्तात्रय डिसले, इमरान तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.



