📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शांतीनाथ प्रतिष्ठान तर्फे तुळजाभवानी ज्योतचे जामखेडमध्ये भव्य स्वागत

शांतीनाथ प्रतिष्ठान तर्फे तुळजाभवानी ज्योतचे जामखेडमध्ये भव्य स्वागत

नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी – सालाबादप्रमाणे यावर्षीही शांतीनाथ प्रतिष्ठाण जामखेड यांच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिरातून पेटवून आणलेली ज्योतचे शहरात आल्यानंतर भक्तांसह ज्योतीचे फटाक्यांच्या आतीषबाजीत व वाजत गाजत भव्य स्वागत करण्यात आले.
जामखेड शहरातील शांतीनाथ प्रतिष्ठान च्या वतीने श्री क्षेत्र तुळजापूर ते जामखेड पायी ज्योत सोहळा आयोजित करण्यात आला होता. पायी ज्योतचे चौथे वर्ष असून दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० च्या सुमारास जामखेड शहरात ज्योत चे आगमन झाले. या ज्योतचे तपनेश्वर येथे ठिक-ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.

भक्तिमय वातावरणात सिध्दीविनायक प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश देशमुख व सचिन देशमुख यांनी सपत्नीक ज्योत घेवून आलेल्या भक्तांचे पाय धुवून तसेच ज्योती बरोबरचे सर्व भक्तांना गुलाल लावून हार फुलाने ज्योत ची पूजा करून स्वागत केले. तसेच देवीची प्रतिष्ठापणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे व त्यांच्या सौभाग्यवती नंदाताई राजेंद्र गोरे यांच्या हस्ते पूजा करुन महाआरती करण्यात आली.

याप्रसंगी संजय औचरे,दत्तात्रय उतेकर,बाबासाहेब अडाले, दिनेश औचरे,राजेंद्र पोकळे,महादेव रसाळ,मुकुंद पोकळे,अक्षय पोकळे,ज्ञानेश्वर सानप,लखन क्षिरसागर,दादा महाडिक,शत्रुघ्न उतेकर(मेजर),मनोज कार्ले, रामदास सोनटक्के, शिवाजी पोकळे,विवेक वाघमारे,संकेत वाघमारे,अक्षय माने,अरविंद शिंदे,गणपत बनगे,अभिजीत शिर्के,सोमनाथ जाधव,विकास चव्हाण, गणेश काटकर, तेजस सातपुते,सुमित ओव्हळ,आदित्य पोकळे,अनंत मोरे,रोहित डूचे, बालाजी काटकर,अनिकेत मोरे,ओंकार मोरे,आदित्य निकनाथ,अजिंक्य जाधव,तन्मय भैसडे,दत्तात्रय क्षिरसागर,सोहम जगताप,सार्थक उतेकर,अजय राऊत,सार्थक शिंदे,योगेश भोगे,राजु भोंडवे, सचिन आगलावे,अंबादास दळवी,कल्याण जगताप, निखिल चव्हाण,दिलीप क्षिरसागर,रोहन रसायली,यश जगताप, मंगेश औचरे,अमोल पागिरे, विशाल दळवी आदी कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्योत आणण्यासाठी विशेष सहकार्य लक्ष्मण गोरे,अविराज ढमढेरे,साईनाथ जाधव, क्रांतिसिंह नेटके आदींनी केले.
नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Back to top button