बीड

टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सायली जगताप यांची वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती; ग्रामस्थांकडून सत्कार

टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सायली जगताप यांची वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती; ग्रामस्थांकडून सत्कार

 

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप यांची कन्या डॉ. सायली जगताप यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या यशाबद्दल टाकळसिंग येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. सायली जगताप यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत वस्ती शाळेत झाले. त्यानंतर पाचवी ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकळसिंग येथे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी कन्या प्रशाला, आष्टी येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. अकरावी व बारावीचे शिक्षण त्यांनी लातूर येथील राजश्री शाहू कॉलेजमध्ये पूर्ण केले.
महाराष्ट्राचे माजी मंत्री व मराठवाडा भूषण, आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वैद्यकीय क्षेत्राची वाट निवडली. त्यानंतर डहाणू येथील एमबीबीएस महाविद्यालयात प्रवेश मिळवून त्यांनी एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली. सध्या त्या पुढील पीजी शिक्षणासाठीही तयारी करत आहेत.
आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनानुसार बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज केल्यानंतर त्यांची टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या यशाचे संपूर्ण श्रेय बद्रीनाथ जगताप यांनी आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाला दिले असून आमच्या कुटुंबाची प्रगती आ.धस यांच्या मार्गदर्शनामुळेच झाली आहे. ते आमच्या कुटुंबासाठी दैवतासारखे आहेत अशी भावना यावेळी बद्रीनाथ जगताप यांनी व्यक्त केली.
सत्कार समारंभ प्रसंगी सरपंच बलभीम वाघमोडे, चेअरमन अंगद जगताप, ग्रामविकास अधिकारी नवनाथ लोंढे, माजी सरपंच कांतीलाल जोगदंड, बाळासाहेब जगताप, संभाजी जगताप, विश्वंभर जगताप, अण्णासाहेब जगताप, लक्ष्मण कुमकर, डॉ. सुनील पठाडे, केशव जगताप, भाऊसाहेब नेटके, सखाराम बनकर, डिगांबर जगताप, मुख्याध्यापक महेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी सदस्य तसेच टाकळसिंग येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

आमदार सुरेश धस यांचे मोलाचे मार्गदर्शन; आमच्यासाठी दैवताप्रमाणे – बद्रीनाथ जगताप

“आमदार सुरेश धस यांचे आम्हाला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. माझी मुलगी डॉ. सायली जगताप हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले त्या दिवसापासून ते ते स्वप्न साकार होईपर्यंत आमदार सुरेश धस यांनी आम्हाला सतत प्रेरणा, मार्गदर्शन आणि आधार दिला. केवळ राजकीय नेतृत्व नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याप्रमाणे त्यांनी आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून वेळोवेळी सहकार्य केले.
आज माझ्या मुलीने वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणे हे आमच्यासाठी अभिमानाचे क्षण आहेत. या यशामागे आमदार सुरेश धस यांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात लाभले आहेत. आमच्या कुटुंबाच्या प्रत्येक यशामागे त्यांचे मोलाचे योगदान असून ते आमच्यासाठी दैवताप्रमाणे आहेत,” अशी भावना आष्टी पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप यांनी व्यक्त केली.

Back to top button