रजनीकांत साखरे यांना साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार प्रदान

रजनीकांत साखरे यांना साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार प्रदान
जामखेड प्रतिनिधी -ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५ मध्ये साहित्यसेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक रजनीकांत रोहिदास साखरे यांना साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार २०२५ प्रदान करून गौरविण्यात आले.
मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि साहित्यातील योगदानासाठी साखरे यांनी दिलेल्या निस्वार्थ सेवेसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला.सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ही विशेष बाब असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अर्जुन राऊत, उपाध्यक्ष श्री. संदीप पटारे आणि कार्याध्यक्ष श्री. सागर पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या सोहळ्यात अनेक साहित्यिक, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञांची उपस्थिती होती. पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानामुळे संमेलनाला एक वेगळेच वैभव प्राप्त झाले. मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करत संस्थेने एक आदर्श निर्माण केला आहे. रजनीकांत साखरे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.जामखेड करांसाठी ही गौरवास्पद बाब आहे.



