बीड
रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत उपोषण मात्र ग्रामपंचायत समोर

रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत
उपोषण मात्र ग्रामपंचायत समोर
मला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न :- सरपंच कोकाटे यांचा आरोप
बीड( प्रतिनिधी ) माजलगाव तालुक्यातील ढेपेगाव सांडस चिंचोली रस्त्यावरील वसाहतीच्या काही नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसाठी ढेपेगाव ग्रामपंचायतला उपोषणाचा इशारा दिला असून सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग माजलगाव अंतर्गत येत आहे त्यामुळे ढेपेगाव ग्रामपंचायत समोर उपोषण करून मला आणि गावकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे असा आरोप ढेपे गावचे सरपंच दत्तात्रेय कोकाटे यांनी केला असून तशा अंशयाचे पत्र गटविकास अधिकारी माजलगाव यांना देऊन कळवले आहे
माजलगाव तालुक्यातील ढेपेगाव सांडस चिंचोली हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग माजलगाव यांच्या अंतर्गत येत असून हा रस्ता करणे किंवा त्याचे दुरुस्ती करणे हे कामही माजलगावच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येत आहे असे असतानाही सदर रस्त्यांच्या वस्तीवरील काही नागरिकांनी ढेपेगाव ग्रामपंचायतीने रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी करत उपोषणाचा इशारा दिला आहे मात्र सदर रस्ता ढेपेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत येत नसतानाही उपोषण करून मला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे असा आरोप सरपंच दत्तात्रय कोकाटे यांनी केला आहे आणि हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येत असून तो ढेपेगाव ग्रामपंचायत च्या हद्दीत येत नाही असे निवेदन माजलगाव गटविकास अधिकारी यांना देऊन कळवले आहे तरीही या उपर उपोषण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकारी माजलगाव आणि प्रशासनाचे राहील असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर सरपंच उपसरपंच यांच्यासह गावकऱ्यांच्या सह्या आहेत



