📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

स्वराज्य पॅनेलचे युवा नेतृत्व निलेश उपाध्ये यांना बँकेच्या सेवेची संधी द्या – चौरे

स्वराज्य पॅनेलचे युवा नेतृत्व निलेश उपाध्ये यांना बँकेच्या सेवेची संधी द्या – चौरे
मुंबई (प्रतिनिधी) दि म्युनिसिपल को ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक पदासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश राजमल उपाध्ये हे स्वराज्य पॅनल कडून उभे आहेत.  निलेश राजमल उपाध्ये यांनी आजपर्यंत कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांचे कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत अजूनही करत आहेत.  आपले काम सांभाळून ओळखीच्या किंवा फोनद्वारे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर विविध प्रकारचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयाच्या विविध विभागातून उपाध्ये यांनी कायम मदतीचा हात दिला आहे.  त्याच बरोबर इतर विभागात देखील त्यांचे सौजन्यपूर्वक संबंध असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे.  त्यामुळे युवा नेतृत्वाला दि म्युनिसिपल को-ओपरेटिव्ह ऑफ बँकेचे संचालक पदासाठी सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सचिन चौरे यांनी केले आहे.
यावेळी वैभव नाईक, सुधीर खांडेकर, विश्वास पाटील, अजित वाघ, संतोष घुगे, अजिंक्य पवार, सुरेश काळे, गजानन वाघमोडे, शिवकुमार जिंदमवर, अविनाश देशमुख, विजय निकम उपस्थित होते.
Back to top button