स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा यांचे महत्त्वपूर्ण योगदान : प्रा.मधुकर राळेभात

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा यांचे महत्त्वपूर्ण योगदान : प्रा.मधुकर राळेभात
भाजप शहर मंडलतर्फे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन
जामखेड प्रतिनिधी : भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित करून समाजात एकतेची भावना निर्माण केली. निसर्ग, वनसंपत्ती, झाडे, झुडपे आणि वन्यप्राण्यांचे महत्त्व पटवून देतानाच अंधश्रद्धेविरोधात जनजागृती केली. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता. इंग्रजांच्या अन्यायकारक सत्तेविरोधात आदिवासी समाजाला एकत्र करून स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी केलेल्या कार्यामुळे आदिवासी समाज त्यांना श्रद्धेने धरती आबा अर्थात पृथ्वीचा पालनकर्ता मानतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भाजपा शहर मंडलच्या वतीने शहरातील भाजपा कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून आपण सर्व एक आहोत, ही भावना रुजवली. त्यांनी निसर्गसंवर्धनाचा संदेश देतानाच सामाजिक कुप्रथा आणि अंधश्रद्धांविरोधात आवाज उठवला. इंग्रजांविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित करून सशस्त्र लढा उभारला. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
या अभिवादन सभेस भाजपा शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय काका काशिद, शहर उपाध्यक्ष अर्जुन म्हेत्रे, चिटणीस विजय कुलकर्णी, जामखेड नगरपरिषदेचे भाजपा गटनेते तात्याराम पोकळे, नगरसेवक पवन राळेभात, अशोक शेळके, डॉ. नितीन अनभुले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



