बीड

पैठणच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडा  माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची मागणी 

पैठणच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडा
माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची मागणी
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यात बहुतांश भागात पेरणी झालेली आहे तर काही ठिकाणी धूळपेरणी झालेली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेवराई तालुक्यासह इतर तालुक्यातील सुकणारी आणि करपणारी पिके वाचवण्यासाठी तात्काळ उजव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केली आहे.
         गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर सातत्याने आंदोलन करणारे शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी यापूर्वीही उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी पैठण येथील नाथसागराचे दरवाजे उघडण्याचे मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर गेवराई तालुक्यातील उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी नुकसान ठरले होते. यावर्षीही गेवराई तालुक्यात जून आणि जुलै मध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने ऊस लागवड आणि इतर पिकांची पेरणी केलेले शेतकरी हातबल होताना दिसत आहेत. गोदावरीच्या पात्रालगत आणि कॅनॉल च्या पानावर आधारित अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. मात्र पावसा अभावी ऊस पिवळा पडत आहे. खरीप पिकेही मोठ्या प्रमाणावर सुकू लागली आहेत. तर काही भागात ती करपली आहेत. पैठणच्या नाथसागरातून येणाऱ्या उजव्या कालव्यातून पाणी सोडल्यास या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळेल, अशी भावना या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या उजव्या कालव्यातून तात्काळ पाणी सोडून पिकांना जीवदान द्यावे अशी मागणी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केली आहे.
Back to top button