बीड

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश दिघोळ–माळेवाडी पुलासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

दिघोळ–माळेवाडी पुलासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

जामखेड प्रतिनिधी : जामखेड तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे दिघोळ–माळेवाडी ग्रामीण मार्गावरील मांजरा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्ड (NABARD) अंतर्गत ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हा पूल उभारल्यानंतर ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुरक्षित व वेगवान होणार असून, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार व व्यापारी वर्गाचा प्रवास सुलभ होईल. पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी व अडचणी दूर होऊन जामखेड तालुक्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या निधी मंजुरीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

Back to top button