रेकाॅर्ड ब्रेक गर्दी ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

रेकाॅर्ड ब्रेक गर्दी ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
सदाफुले वस्ती येथील राणा बॉइज आयोजित मिरवणुकीत मोठ्या उत्साहात
जामखेड प्रतिनिधी – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सदाफुले वस्ती येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. राणा बॉइज मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या पूजन प्रसंगी प्रा. विकी घायतडक, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, नगरसेवक शामिर सय्यद,
दिपक सदाफुले, संतोष गव्हाळे, विशाल अब्दुले ,अमोल सदाफुले हे मान्यवर उपस्थित होते.
सदाफुले वस्ती येथून मिरवणुकीला प्रारंभ होऊन मेन पेठमार्गे संविधान स्तंभ येथे सांगता झाली. महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली.
या मिरवणुकीत समता ग्रुप – आरोळे वस्ती, मिलिंद नगर, सिद्धार्थ नगर आणि संपूर्ण तालुक्यातील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये सुकेंद्र सदाफुले, सुनील जावळे, महेंद्र आगे, राहुल सदाफुले यांचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विकी घायतडक मित्र मंडळ,स्वप्निल राणा बॉइज मित्र मंडळ, अमोल सदाफुले, गौरव सदाफुले, कबीर घायतडक, प्रीतम घायतडक, आकिब आत्तार, शुभम सदाफुले, शुभम घायतडक, सुमित घायतडक, किशोर समुद्र यांनी विशेष मेहनत घेतली.
*मिरवणुकीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवून अभिवादन केले*
सरपंच कैलास माने, सलीम बागवान, प्रा. लक्ष्मण ढेपे, हाजी नादीर, सद्दाम शेख,प्रविण बोलभट, विष्णू गंभीरे, अण्णा ढवळे, सोहेल काझी, अबरार सय्यद, बौद्धचार्य अशोक आव्हाड, शामिर सय्यद आदी उपस्थित होते.



