📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रुग्णांचा आधारवड ठरणार शिवकृपा सुपरस्पेशालिटी 

रुग्णांचा आधारवड ठरणार शिवकृपा सुपरस्पेशालिटी
बीड-काही मोजक्या  डॉक्टरांची सुरुवात अतिशय सामान्य किंवा ग्रामीण भागातून झालेली असते. मराठी माध्यमाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून,अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत कठोर मेहनतीने एमबीबीएस, एमडी किंवा उच्च वैद्यकीय पदव्या ध्येयवेडे तरुण मिळवतात. त्यांचे दिवस-रात्र केलेले पाठांतर,घरच्या हालखीच्या परिस्थितीची जाण ठेवत कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करते आणि ‘डॉक्टर’ बनते, तेव्हा तो आनंद फक्त त्या कुटुंबाचा राहत नाही, तर संपूर्ण गावाचा आणि समाजाचा असतो.आज त्याच सामान्य कुटुंबातील डॉ.नागेश उंदरे (M.B.B.S.M.S.Mch Paediatric Advance Laparoscopic Surgeon and Paediatric Urologist)  आणि डॉ.प्रज्ञा उंदरे (कोटूळे) (M.B.B.S.M.D.Medicine and Intensivist) यांच्या शिवकृपा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या लोकार्पण होतं आहे. बीडच्या रुग्णांसाठी हा अविस्मरणीय क्षण असणार आहेच पण इथल्या रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरणार आहे.
      डॉ. नागेश उंदरे हे बाल शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. बीड तालुक्यातील ससेवाडी हे त्यांचे मूळ गाव. घरात कोणीही वैद्यकीय क्षेत्रात नाही. गावात रुग्णांना उपचार करायचे म्हटले तर एकाच डॉक्टरावर आसपासच्या गावाचीही जबाबदारी.गावाखेड्यातील वातावरण बघत डॉक्टर होण्याचे स्वप्न मनात ठेवले अन सुरु झाली ती जीवनाची वाटचाल.प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. नंतर माध्यमिक शिक्षणासाठी गाव सोडून शहराची वाट पकडली. वडील एसटी खात्यात वाहक. तर आई शेतमजूर. पण पोरानं शिकून मोठं व्हावं हे आई-वडिलांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी बीडला येण्याचा निर्णय झाला. माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालयात झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण बलभीम महाविद्यालयात. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असल्याने आई-वडिलांनी परिस्थितीचा विचार न करता पोराच्या शिक्षणाला बळ दिले, आणि यातूनच नागेश उंदरे यांनी नीटमध्ये घवघवीत यश संपादन करत अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवला.एका छोटया खेडातून सुरु झालेला प्रवास आज संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी आहे.पाच वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी म्हणजे  एमएस यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात झाले. मात्र एवढ्यावरच समाधान न मानता डॉ. नागेश उंदरे यांनी ‘एमसीएस’ चे अर्थात सुपरस्पेशालिटीचे शिक्षण मुंबईच्या सायनमधून पूर्ण केले आहे.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुपर हॉस्पिटल आणि वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दोन वर्ष सेवा दिली.लाखो रुपयांचे पगार आणि मोठमोठ्या संधी असतानाही डॉ.उंदरे यांनी ज्या मातीत जन्मलो त्याच मातीत सेवा करण्यासाठी पुन्हा मूळ गावी येण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षभरात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया डॉक्टर उंदरे यांनी केल्या. बीडच्या मातीत रुग्णांची सेवा करायला संधी मिळते याचे त्यांना मनोमन समाधान वाटते. वर्षभराच्या त्यांच्या कार्यकाळात ज्या शस्त्रक्रिया झाल्या त्या आजपर्यंत बीडच्या इतिहासात कधीच झाल्या नव्हत्या.रुग्णांची बाहेर जिल्ह्यातील होणारी परवड थांबणार असून खात्रीशीर उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणून त्यांच्या रुग्णालयाकडे आता पाहिले जाईल असे चित्र आहे.त्यांच्या जोडीला अर्धांगिनी डॉ. प्रज्ञा उंदरे (ह्रदयरोग, मधुमेह व दमा तज्ञ) यांची देखील मोलाची साथ असणार आहे. प्रज्ञा या सुद्धा शेतकरी कुटुंबातील.आई-वडील दोघेही शेतकरी. पण लहानपणापासून अभ्यासाची आवड. बालपणीच शिक्षण वरवटी (धानोरा) इथेच झाले. नंतर माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय आणि उच्च माध्यमिक शिक्षण बलभीम महाविद्यालयात. कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थिनीमध्ये सर्वात आघाडीवर प्रज्ञा कोटूळे यांचे नाव. आई-वडिलांनी पोरगी नाव काढणार म्हणून तिच्या स्वप्नांना पंख दिले.शेतात घाम गाळून लेकीला भरीरी घेण्यासाठी आधार दिल्यामुळे प्रज्ञा यांना नीटमध्ये दणदणीत गुण पडले. एमबीबीएससाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात नंबर लागला. नंतर तिथे शिक्षण झाल्यानंतर एमडी मेडिसिन यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालय वसंतराव नाईकमध्ये घेतले.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाण्याच्या शिवाजी हॉस्पिटल आणि अंधेरीच्या सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये लाखोंच्या पगाराची नौकरी मिळाली. मात्र मन गावाकडच्या मातीत असल्याने गलेलठ्ठ पगार सोडून यायचा निर्णय घेतला. आज डॉ.प्रज्ञा उंदरे या देखील सुप्रसिद्ध हृद्यरोग, मधुमेह व दमा तज्ञ आहेत.मुंबईतील सिनेअभिनेते असतील किंवा मोठे उद्योगपती त्यांच्यावर डॉ. प्रज्ञा यांनी उपचार केले आहेत. थेट मुंबईतून गावाकडच्या मातीत दोन्ही प्रतिभावंत डॉक्टर येतं असल्यामुळे याचा जिल्हावासियांना फायदा होणार आहे.उद्यापासून शिवकृपा हॉस्पिटल स्वराज्यनगर, बार्शी रोड येथे सुरु होतं असून २४ तास अत्यावश्यक सेवा या रुग्णालयात रुग्णांना मिळणार आहेत.
चौकट
डॉक्टर उंदरे दाम्पत्याची यशाचे शिखर आणि समाजसेवा…
मोठ्या शहरात लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी नाकारून डॉ.नागेश उंदरे असतील किंवा डॉ. प्रज्ञा उंदरे आपल्या गावी परतले आहेत. आपल्या गावात एक अत्याधुनिक पण सामान्यांना परवडणारे रुग्णालय सुरू केले.तत्पूर्वी डॉ. नागेश उंदरे यांनी मागच्या वर्षभरात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया बीडमध्ये केल्या आहेत. त्यात दोन दिवसांच्या बाळावर गुदद्वार नसल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करून गुदद्वार  तयार करण्याची पहिलीच शस्त्रक्रिया बीडमध्ये झाली. याशिवाय सहा महिन्यांच्या बाळावर डोक्याचा घेर हळूहळू वाढत असताना शरीर तेवढेच राहत होते. मात्र डोक्याचा आकार प्रचंड वाढत होता.शस्त्रक्रिया करून डॉ. उंदरे यांनी त्या बाळाला जीवदान दिले आहे.तसेच पोटातील गाठी, ट्यूमरच्या आजारावर देखील त्यांनी योग्य उपचार केले असून अल्पवाधित रुग्णांना विश्वास देण्यात त्यांना यश आले आहे.
चौकट
रुग्णालयात मिळणार या सुविधा
लघवीच्या जागेची त्वचा घट्ट असणे, स्टॉपलर फायमॉसिस सर्जरी आणि आधुनिक फायमॉसिस सर्जरी, हायड्रोसिल, हर्निया,अंडवृषण खाली न उतरणे,जीभ चिकटलेली असणे, दुभंगलेले ओठ आणि टाळू, मेंदूत पाणी होणे, मेंदूज्वराशी संबंधित आजार, मूत्रपिंड आणि मूत्रशयातील खडे, लघवीची जागा चुकलेली असणे, जन्मजात गुदद्वार नसणे, आताड्याचा आजार, अपेंडिसायाटीस, आताड्यामध्ये आताडे अडकणे, पोटातील गाठी, ट्यूमर, जन्मजात दोषासाठी नवजात बालकांवरील शस्त्रक्रिया, प्रसूतीपूर्व समुपदेशन याशिवाय लहान मुलांमधील अपघात आणि जखमा, भाजणे, न्यूमोनिया, न्यूमोथोरॅक्स, घशात किंवा पोटात बाहेरील वस्तू अडकणे यावर डॉ. उंदरे उपचार करणार आहेत. तर दुसरीकडे हृद्यविकार, उच्च व कमी रक्तदाब, दमा, कावीळ, आजारावर उपचार, सर्पदंश, विषबाधा, व अत्यवस्थ रुग्णांवर विशेष उपचार, मधुमेह निदान व उपचार, रक्त कमी होणे, क्षयरोग, दमा, निमोनिया व फुफुसांचे गंभीर आजार,मेंदूज्वर, फिट्स, किडनी विकार, व यकृत विकार निदान व उपचार, डेंग्यू, मलेरिया व टायफाईड यासारखे संवेदनशील आजार, अपचन, ऍसिडिटी,भूक न लागणे, सतत तोंड येणे यासारख्या आजरांचे निदान व उपचार डॉ. प्रज्ञा उंदरे करणार आहेत.
Back to top button