बीड

निकृष्टतेच्या आरोपांनंतर हालचाल; नव्या साठ्याची नेत्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

निकृष्टतेच्या आरोपांनंतर हालचाल; नव्या साठ्याची नेत्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

भूमिगत गटार योजनेत ‘नो कॉम्प्रमाईज’ भूमिका

जामखेड | प्रतिनिधी :

जामखेड नगर परिषद हद्दीत सुमारे ८० कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्याच्या तक्रारी पुढे आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, आता नव्याने खडी व वीट यांचा साठा करून काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी (काका) राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक महेश निमोणकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, नगरसेवक वसिम सय्यद,पै. दीपक घायतडक, डॉ. प्रणव राळेभात, स्वामी दीक्षित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नेत्यांनी मटेरियलची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत समाधानकारक बाबींची खात्री करण्याची गरज व्यक्त केली.

शहराच्या स्वच्छता व आरोग्यदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या भूमिगत गटार योजनेची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

—————————-

या योजनेत कोणत्याही प्रकारे गुणवत्तेबाबत तडजोड होता कामा नये. नागरिकांच्या कररूपातील पैशांतून उभारल्या जाणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता व दर्जा राखणे अत्यावश्यक आहे,कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात निकृष्ट मटेरियल वापरल्याच्या तक्रारी समोर आल्याने संबंधित ठिकाणी नव्याने मटेरियल साठविण्यात आले आहे. यापुढे कामाची काटेकोर तपासणी करूनच पुढील टप्पे पूर्ण करावेत.

शहाजी (काका) राळेभात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

Back to top button