📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वडार समाज बांधवांनो, आज बीडमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहा!

वडार समाज बांधवांनो, आज बीडमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहा!
संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले यांच्या बीड दौऱ्यानिमित्त जिल्हाध्यक्ष धर्मराज (बाळासाहेब) गुंजाळ यांचे जाहीर आवाहन
बीड | दि. १३ ऑक्टोबर २०२६
वडार समाजाच्या एकजुटीचा, स्वाभिमानाचा आणि संघटनात्मक ताकदीचा परिचय देण्यासाठी आज बीडमध्ये सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन वडार समाज संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती धर्मराज (बाळासाहेब) गुंजाळ यांनी केले आहे.
वडार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयदादा चौगुले हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यादरम्यान ते जिल्हाध्यक्ष धर्मराज (बाळासाहेब) गुंजाळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. तसेच बीड शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी माता देवीचे दर्शन घेऊन आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर माऊली नगर येथे विजयदादा चौगुले समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत.
या भेटीच्या निमित्ताने समाजातील विविध प्रश्न, समाजाचे संघटन, सामाजिक प्रगती आणि भविष्यातील वाटचाल याबाबत विचारविनिमय होणार आहे. त्यामुळे हा दौरा समाज बांधवांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ही वेळ आहे समाजाची एकजूट दाखवण्याची, आपल्या संघटनेची ताकद सिद्ध करण्याची आणि समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याची! त्यामुळे बीड शहरासह जिल्ह्यातील सर्व वडार समाज बांधवांनी, युवकांनी, ज्येष्ठांनी आणि समाजप्रेमींनी आपापली कामे बाजूला ठेवून आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
आपली उपस्थिती हीच समाजाच्या एकजुटीची खरी ताकद आहे. चला, सर्वांनी एकत्र येऊया, समाजाच्या हितासाठी हातात हात घालून उभे राहूया आणि विजयदादा चौगुले यांचे उत्स्फूर्त स्वागत करूया!
— धर्मराज (बाळासाहेब) गुंजाळ
जिल्हाध्यक्ष, वडार समाज संघटना तथा सभापती, बीड नगरपरिषद
Back to top button