बीड

बीड जिल्हा वकील संघ निवडणुकीत ॲड अध्यक्ष म्हणून सुभाष पिसुरे हे विजयी

बीड जिल्हा वकील संघ निवडणुकीत ॲड अध्यक्ष म्हणून सुभाष पिसुरे हे विजयी

 साला प्रमाणे वकील संघा चे सन २०२५–२६ चे इलेक्शन पार पडले असे की बीड जिल्हा वकील संघाचे दरवर्षी होणारे ईलेक्शन हे दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडले. सदरचे इलेक्शन हे दरवर्षी सात पदांकरिता होते. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,सहसचिव, कोषाध्यक्ष, ग्रंथपाल सचिव, व महिला प्रतिनिधी इत्यादी पदांसाठी सदरचे इलेक्षण दरवर्षी घेतले जाते. यावर्षी देखील अति उत्साहाने वकील संघाचे २०२५ चे इलेक्शन पार पडले. त्यात अध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांची चुरस पाहायला मिळाली त्यात ॲड. सुभाष पिसुरे, ॲड. प्रशांत देशपांडे, ॲड. गणेश कारंडे उपाध्यक्ष पदासाठी ॲड. रघुराज देशमुख, ॲड. संग्राम तुपे व ॲड शहादेव भंडारे यांच्यामध्ये चुरस होती. तर सचिव पदासाठी ॲड. सुभाष काळे व ॲड. किशोर खेडकर यांच्यामध्ये चुरस होती. महिला प्रतिनिधी या पदासाठी
ॲड. मनीषा गडकर व ॲड. बबीता पळसेकर यांच्यामध्ये चुरस होती. सदर इलेक्शन मध्ये ८०३ पैकी ६८८ उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण सरासरी ८६ टक्के मतदान झाले. अध्यक्ष पदाच्याअटीतटीच्या लढतीत अध्यक्ष म्हणून ॲड. सुभाष पिसुरे अधिक मतांनी निवडून आले उपाध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत ॲड. रघुराज देशमुख
मतांनी निवडून आले. सचिव पदाच्या अटीतटीच्या लढतीत ॲड. सुभाष काळे हे विजयी ठरले. वरील उमेद्वारांनी मताधिक्याने विजयी होण्याचा माण मिळवला. सदरचे इलेक्शन हे अत्यंत शांततेत उत्साहाच्या वातावरणात शिस्ततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. सदरच्या इलेक्शन मध्येमहिला प्रतिनिधी म्हणून ॲड. मनीषा गडकर या १६९ अधिक मते घेऊन विजयी झाल्या या विजयी उमेद्वार ठरल्या कोषाध्यक्ष म्हणून ॲड. योगेश टेकाडेहे विजयी उमेदवार विजयी ठरले, सहसचिव पदासाठी उमेद्वार ॲड. धीरजकुमार कांबळे हे विजयी ठरले,
 जे विजयी उमेदवार ठरले त्यांना संपूर्ण वकील संघाने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Back to top button