राजुरीत महावितरणचा निष्काळजीपणाचा मेन लाईनच्या तारा झाडांमधून— गावकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

राजुरीत महावितरणचा निष्काळजीपणाचा मेन लाईनच्या तारा झाडांमधून— गावकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
जामखेड (प्रतिनिधी):-राजुरी (ता. जामखेड) येथे महावितरणकडून सुरू असलेल्या मेन लाईनच्या कामावर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत लाईनचे खांब झाडामधून तसेच रस्त्याच्या साईट पट्टीवर उभे करण्यात आले असून, हे भविष्यात अतिशय धोकेदायक ठरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे याआधी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असे असताना पुन्हा एकदा धोका निर्माण करणारी ही लाईन गावातील मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला नेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गावकऱ्यांनी मागणी केली आहे की, ही मेन लाईन गावाच्या बाहेरून नेण्यात यावी, अन्यथा संपूर्ण राजुरी गावकरी रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
गावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून महावितरणने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



