बीड

सामाजिक कार्याचे व्रत जोपासलेले खटाणे-बहिरवाळ यांचा सत्कार

सामाजिक कार्याचे व्रत जोपासलेले खटाणे-बहिरवाळ यांचा सत्कार
बीड (प्रतिनिधी)ः शासकीय कार्यालयामध्ये काम करुन कर्तव्यावर असतांना नागरिकांचे काम ही जबाबदारी तसेच नौकरी व्यतिरिक्त देखील समाजसेवा ही बांधिलकी आहे असे व्रत जोपासलेले नारायण खटाणे व सतिश बहिरवाळ यांचा जन्मदिनानिमित्त सत्कार शिवसेनेच्या वतीने शिवसेना तथा देवसेना संपर्क कार्यालय धानोरा रोड येथे देवसेनेचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील गुजर, गायकवाड मास्तर, शिरसट मामा ,काशीद मामा, तुकाराम जाधव, महादेव जाधव, शिरपती वीर, लखन डोंगरे,ओमकार जाधव व सर्व समाज बांधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पिंपळवाडी गावचे नारायण खटाणे हे सध्या पोलीस कर्मचारी असून त्यांनी त्यांच्या पदावर राहून नागरिकांसाठी जे होईल ते काम प्रामाणिकपणे केलेले आहे तसेच सतीश बहिरवाळ हे जिल्हा परिषद कर्मचारी असून त्यांनी शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच नागरी समस्यांचे प्रश्न वरिष्ठांमार्फत अनेकदा सोडविलेले आहेत यांच्या कार्याबद्दल तसेच जन्मदिन असल्यामुळे या दोघांचाही सत्कार शिवसेना तथा देवसेना संपर्क कार्यालय धानोरा रोड येथे करण्यात आला.यावेळी शिवसैनिक तसेच गुजर समाज बांधवांची उपस्थिती होती.
Back to top button