📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

नवगण महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात

नवगण महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात
परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महाविद्यालय आणि विद्यार्थी-पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा, तसेच माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवांचा वर्तमान विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे होते. श्री. बालासाहेब देशमुख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. मंजीत सुगरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक श्री बाळासाहेब देशमुख यांनी कृषी राजकारण समाजकारण या विषयाच्या समृद्ध अनुभवाचे मांडणी केली. तर एडवोकेट सुगरे यांनी गुरु शिष्य यांच्यामध्ये नाते आणि स्नेह वृद्धिंगत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजा आचार्य यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बापू घोलप यांनी केले, तर आभार डॉ. दिलीप गिर्हे यांनी मानले. प्रारंभी महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने स्वागतगीत सादर करण्यात आले.
यावेळी पालक प्रतिनिधी दैवशाला जुद्दर यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या शैक्षणिक व विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांविषयी आपले विचार मांडले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रतीक्षा साखरे, यास्मिन सुलताना आणि कृष्ण रेकने यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आपल्या अनुभवांविषयी तसेच शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांविषयी विचार मांडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी मेळावा समन्वयक डॉ. उद्धव मुळे, प्रा. कुरडे आणि कार्यालय अधीक्षक नरेश साखरे यांनी नियोजन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Back to top button