बीड
सरकार देवस्थानांवर मेहेरबान मात्र ज्ञानमंदिर आणि आरोग्य मंदिराकडे दुर्लक्ष ; मंदिर विकासाप्रमाणेच ज्ञानमंदिर, आरोग्य मंदिरासाठीही निधी द्यावा :- डॉ.गणेश ढवळे

सरकार देवस्थानांवर मेहेरबान मात्र ज्ञानमंदिर आणि आरोग्य मंदिराकडे दुर्लक्ष ; मंदिर विकासाप्रमाणेच ज्ञानमंदिर, आरोग्य मंदिरासाठीही निधी द्यावा :- डॉ.गणेश ढवळे
—
बीड:- ( दि.२७ ) राज्यातील महायुती सरकार देवस्थानांवर चांगलेच मेहेरबान असुन मागील वर्षात मराठवाड्यात तीर्थक्षेत्र क आणि ब मधील ५५९ देवस्थानांच्या विकासासाठी ६२ कोटींचा खर्च होत आहे.तथापि सद्यस्थितीत ५५९ पैकी १२० कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत तर १७८ कामे अद्याप सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.मंदिर विकासांची कामे होत असल्याने भाविक भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याचवेळी देवस्थानांच्या विकासाला महत्त्व देतानाच मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ज्ञानमंदिरे आणि आरोग्य सुविधा पुरवणारी आरोग्य मंदिराकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत असुन देवस्थानांच्या विकासाबरोबरच गावातील शाळा आणि आरोग्य केंद्राच्या विकासासाठी ग्रामस्थ आणि पुढा-यांनी पुढाकार घ्यावा आणि सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
सविस्तर माहितीस्तव
—
मराठवाडा संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.याठिकाणी मठ, मंदिर आणि देवस्थानांची संख्या आधिक आहे.अनेक गावात ३-४ नावाजलेली देवस्थाने आहेत.त्यांचा विकास व्हावा यासाठी संबंधित ग्रामस्थ कायम प्रयत्नशील असतात.अशाच ५५९ देवस्थानांच्या विकास कामाला सरकारने मागील वर्षी मंजुरी दिलेली आहे.मंजुरी दिल्यानंतर अनेक ठिकाणी तातडीने कामे सुरू करण्यात आली असुन यातील १२० कामे पूर्ण करण्यात आली आहेत.याठिकाणी मंदिर परीसराचे सुशोभीकरण, सभामंडप, पिण्याच्या पाण्याचा हौद, पेव्हर ब्लॉक, विद्युतीकरण अशी आवश्यकतेनुसार कामे करण्यात येत आहेत.
देवस्थानांच्या विकासाप्रमाणेच ज्ञान मंदिर आणि आरोग्य मंदिरांचा विकासासाठी निधी द्यावा :- डॉ.गणेश ढवळे
—
संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यात देवस्थानांची संख्या आधिक आहे .सप्ताह,यात्रा आदि कार्यक्रम होत असल्याने लोकं एकत्र येतात.गाठीभेटी होतात,विचारांची देवाणघेवाण होते.यामुळे देवस्थानांच्या विकासाला महत्त्व दिलेच पाहिजे.परंतु याचवेळी गावातील शाळांना मुलभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या आरोग्य केंद्रांच्या विकासासाठीही ग्रामस्थ आणि पुढा-यांनी पुढाकार घेऊन शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी भावना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली.
विविध कामांची स्थिती
—
जिल्हा -पुर्ण-प्रगतीपथावर-सुरू नसलेली- मंजुर कामे
लातुर -५७-६७-४८-१८९
बीड -२२-२९-०८-८४
संभाजीनगर -१८-४१-२८-८७
जालना -२०-१३-०४-३७
परभणी -००-५१-००-५१
हिंगोली -००-११-००-११
नांदेड -०३-२५-१९-४८
४२ टक्के निधी झाला खर्च
—
तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत ३ वर्ग क साठी ३९२४.७२ लाख रुपये तर ४ ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमासाठी २३९४.२९ लाख रूपयांचा निधी मंजूर असुन आतापर्यंत यातील ४२ टक्के निधी खर्च झालेला आहे.उपलब्ध उर्वरित निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत गेला तरी तो पुन्हा उपलब्ध होत आहे.
नव्या सरकारकडे ढिगाने प्रस्ताव
—
मागील वर्षात ५५९ कामांना मंजुरी दिली होती.परंतु नव्याने सत्ता आल्यानंतर लाडकी बहिण योजनेसाठी निधी वळवल्यामुळे सरकारकडे निधीची वानवा असल्याने या वर्षात नविन मंजुरी देण्यात आली नाही.मात्र नव्याने मंजुरी मिळावी यासाठी मागील वर्षापेक्षा जास्त प्रस्ताव शासनाकडे आल्याची माहिती असुन शासनाकडे ढीगभर प्रस्ताव दाखल झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी त्यापैकी अनेक कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता असुन त्यासाठी स्थानिक नेते मंडळी जोर लाऊन प्रयत्न करत आहेत.



