बीड
अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावणाऱ्यांना 25 हजार रु.ची मदत योजना सुरू करा- डॉ. संजय तांदळे

अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावणाऱ्यांना 25 हजार रु.ची मदत योजना सुरू करा- डॉ. संजय तांदळे
बीड (प्रतिनिधी ) : रस्ते अपघातातील जखमींना कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेअंतर्गत सात दिवसांसाठी दीड लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार तसेच जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात पोहोचणाऱ्या व्यक्तींना मदत करणाऱ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच जाहीर केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह व आपत्कालीन विभाग तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.महामार्ग अभियंता यांच्याकडे चौकशी केली असता अद्याप पर्यंत आमच्याकडे याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती किंवा जी.आर. आलेला नाही असे सांगण्यात आले. सदरील योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने दि. 22 जानेवारी 2026 गुरुवार रोजी निवासी उपजिल्हाधिकारी सोनी साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, सुदाम कोळेकर, बीड शहर बचाव मंचचे मार्गदर्शक प्राचार्य डी.जी. तांदळे ,अध्यक्ष नितीन जायभाये, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे. शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या किस्कींदा पांचाळ आदींची उपस्थिती होती.



