बीड

पावसाच्या पुराच्या पाण्यातुन राजापूरकरांचा जीवघेणा प्रवास….

पावसाच्या पुराच्या पाण्यातुन राजापूरकरांचा जीवघेणा प्रवास….
तलवाडा परिसरात तीन दिवसापासून पावसाची हजेरी;ओढे,नाले जलमय
गेवराई प्रतिनिधी :-तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे राजापूर येथील कापसाच्या पुलावर पाणी आल्याने राजापूर करांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून वाहने अद्याप ही बंद आहेत.या पुलाचे काम व्हावे ही मागणी वेळोवेळी करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात राजापूर करांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतो.
    गेवराई तालुक्यातील राजापूर फाटा ते राजापूर गावाला जोडणारा कापसाचा नाला यावर जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक बंद झाली असून माणसांना जाणे येणे ही करता येत नव्हते सोमवारी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत पाणी असल्याने संपर्क तुटला होता त्या नंतर पाण्याचा जोर कमी झाल्यावर नागरिकांनी पायी मार्ग काढत पाणी ओलांडले परंतु वाहने वाहतूक बंदच होती,या पाण्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून विद्यार्थी,वयोवृद्ध यांना त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात ही समस्या राजापूर करांना भेडसावत असून या ठिकाणी मोठा पूल करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती.मागील दोन तीन वर्षापूर्वी  राजापूर येथील सर्वच जनतेने या पुराच्या पाण्यात आंदोलन उभारून पूल करण्याची मागणी केली होती यावेळी लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनातील अधिकारी यांच्या समवेत भेट देऊन काम करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.परंतु अद्याप ही या ठिकाणचा पूल झाला नसल्याने आता ही राजापूर येथील नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

Back to top button