बीड
प्रितम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात

प्रितम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात
बीड (प्रतिनिधी):- बीड शहरात गेल्या १८ वर्षापासून सुरू असलेल्या मदर तेरेसा बालकाश्रम व महाराष्ट्र गुरुकुल परिषदेच्या वतीने बीडमध्ये जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. निमित्त होते प्रितमजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे. या जिल्हास्तरीय स्पर्धासाठी एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला. बीड शहरातील शाळा व निवासी प्रकल्पांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सर्व सामने बाद फेरी प्रमाणे आयोजित करण्यात आले होते. सर्वच सामने अत्यंत चुरशीचे व स्पर्धात्मक साहस निर्माण करणारे होते. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी दुपारी १:३० ते २:३० या वेळेत सर्व खेळाडूंना स्नेहभोजन देण्यात आले.
शेवटी अंतिम सामना विवेकानंद गुरुकुल व संस्कृती गुरुकुल विद्यालय यांच्यामध्ये खेळला गेला. अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात संस्कृती विद्यालयाने बाजी मारली.
या स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी डॉ. दत्ता नलावडे, रोहिदास रोहिते, भाऊसाहेब सरवदे, बालकाश्रमाच्या अधीक्षिका सविता जाधव, संस्था अध्यक्ष लालाजी जाधव, विजयकुमार गिरे, संतोष देशमुख, काळकुटे आप्पा, धनंजय सोन्ने इ. मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकपर मनोगतात लालाजी जाधव यांनी प्रतिवर्षी या स्पर्धाचे आयोजन करण्याचा शब्द दिला. तर अध्यक्षीय समारोपात डॉ. दत्ताजी नलावडे यांनी सहभागी व विजेत्या संघांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रुपये ३०००, द्वितीय पारितोषिक २०००, तर तृतीय पारितोषिक ११०० रु. मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
बक्षीस वितरण सोहळ्याच्या शेवटी, उपस्थित मान्यवर आणि खेळाडूंच्या समवेत केक कापून प्रितमजी शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक घोडके सर, वाघ सर, हांगे सर, भोसले सर, मा. केशव माटे, बाबासाहेब पवार, राजेंद्र पवार, राजेश्वर जाधव, केशव धिगे, पवन घाडगे, विजयकुमार इंगळे, गोवर्धनजी दराडे, दिपक सुरवसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



