बीड

डॉ. लक्ष्मण उलगडे यांची सोलापूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यासमंडळावर निवड

डॉ. लक्ष्मण उलगडे यांची सोलापूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यासमंडळावर निवड

बीड (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळावर डॉ. लक्ष्मण काशिनाथ उलगडे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. ही निवड विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर व प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.

डॉ. उलगडे हे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे रामपूर थडी येथील शेतकरी कुटुंबातील. सध्या ते उदगीर (जि. लातूर) येथील भारत लिबरल एज्युकेशन सोसायटी संचलित श्री हावगीस्वामी महाविद्यालयात लोकप्रशासन विभाग प्रमुखसहयोगी प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालील एक संशोधक विद्यार्थिनीला जुलै 2025 मध्ये पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

लोकप्रशासन विषयातील त्यांच्या शैक्षणिक कार्याचा मोठा व्याप्ती असून नांदेड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती आणि सोलापूर विद्यापीठांशी संबंधित 11 संदर्भग्रंथ, संपादित ग्रंथ आणि आंतरराष्ट्रीय विशेषांक त्यांनी प्रकाशित केले आहेत. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर 111 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

डॉ. उलगडे यांनी परभणी आकाशवाणी केंद्रयशदा पुणे तसेच राज्यातील अनेक महाविद्यालये, सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय संस्थांमध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय, अभ्यासू आणि परिश्रमी शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी विद्यार्थी विकास केंद्रित अनेक उपक्रम सातत्याने राबविले आहेत.

अलिकडेच लोकप्रशासन विषयातील महाराष्ट्रातील पहिलेच “संकल्पना व तत्त्वे कोश” हे पुस्तक छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित झाले आहे.

निवडणूक प्रक्रियेतही त्यांचा सक्रिय सहभाग असून दोन लोकसभा, दोन विधानसभा, ग्रामपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत मतदान केंद्राध्यक्ष तसेच सहाय्यक झोनल अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. तसेच “करिअर कट्टा” लातूर जिल्हा आणि महाविद्यालयीन समन्वयक म्हणूनही ते कार्यरत होते.

डॉ. उलगडे यांच्या निवडीबद्दल श्री 108 शिवानंद शिवाचार्य महास्वामी तमलुरेश्वर, शिवकुमारअप्पा खुब्बा, माधव उलगडे, शशिकांत टेकाळे, ओमकार खुब्बा, डॉ. शिवशरण निलंगेकर, डॉ. नीला संगमेश्वर तसेच भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, कार्यालयीन अधीक्षक, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच नातेवाईकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Back to top button