सामाजिक सुरक्षा व आर्थिक विकासासाठी घड्याळाला मतदान करा – सौ.शितलताई दाभाडे

गेवराई, दि.21 (प्रतिनिधी) ः- माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आ. विजयसिंह पंडित यांनी नेहमीच गेवराई विधानसभा मतदार संघाच्या विकासाच्या मुद्यावर राजकारण केलेले आहे. सामाजिक सुरक्षा व आर्थिक विकास हाच त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. या मुद्यावर त्यांची चालू असलेली यशस्वी वाटचाल विरोधकांना खूपत आहे. त्यामुळे विरोधक भावनिक राजकारण आणि भुलथापा देऊन अपप्रचार करत आहेत. विरोधकांचा डाव ओळखून विकासाच्या मुद्यावर माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांनी केले. प्रभाग क्र.11 मधील प्रचार दौऱ्यात मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
![]()