बीड

पाडळी गणातून प्रदीप सरवदे निवडणुकीच्या मैदानात

पाडळी गणातून प्रदीप सरवदे निवडणुकीच्या मैदानात
शिरूर दि.२५ (प्रतिनिधी ): तालुक्यातील आगामी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाडळी गणातून युवा कार्यकर्ते प्रदीप भिवसेन सरवदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्य,गोरगरिबांशी असलेला निकटचा संबंध आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड विश्वास या बळावर त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
   आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर पाडळी जिल्हापरिषद गट हा ओबीसीसाठी तर पंचायत समिती गण हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठरल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी प्रदीप सरवदे यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवावी,अशी तीव्र इच्छा व्यक्त केली आहे.पाडळी सर्कलमध्ये त्यांचा मजबूत जनसंपर्क आणि युवक प्रदेशअध्यक्ष महेबूब शेख व आ.संदिप क्षीरसागर यांचे निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे मोठा फायदा होईल असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.
Back to top button