संपादकीय

डॉ. डी.बी. खैरनार प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीरात ४१ रक्तदात्यांचे योगदान

डॉ. डी.बी. खैरनार प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीरात ४१ रक्तदात्यांचे योगदान

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरात दादा या नावाने ओळखले जाणारे तसेच वैदयकीय क्षेत्रात हात खंडा असलेले डॉ.दशरथ भगवान खैरनार यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यंदाही डॉ.डि.बी.खैरनार प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन रमेश चांदेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

या रक्तदान शिबिरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान दिले. गेली पंचवीस वर्षे सातत्याने डॉ.डि.बी.खैरनार प्रतिष्ठान रक्तदान शिबीर आयोजित करत आहे. समाजाचे आपण काही देणे लागते, या अनुषंगाने ते आपण परत केले पाहिजे, असे सांगत समाज सेवा म्हणून शिबीर घेण्यात येत आहे.

डॉ. दशरथ खैरनार उर्फ दादांनी जवळपास ५० वर्षे वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून जामखेडकरांची समाज सेवा केली. रुग्णांकडे पैसे असोत किंवा नसोत, दादांनी वैद्यकीय सेवा मनोभावे केली. पैसे नाहीत म्हणून वैद्यकीय सेवा कधीच नाकारली नाही. या काळात असे डॉक्टर मिळणे दुरापास्त आहे तसेच शोधूनही हे सापडणे अवघड आहे. अशी निखळ सेवा भाव समोर ठेवून काम करणारे डॉ. दशरथ उर्फ दादा खैरनार परिसरात प्रसिद्ध होते. त्यांचा वारसा डॉ. प्रकाश खैरनार व कुटुंबीय पुढे चालवत आहेत.
याप्रसंगी डॉ. प्रकाश खैरनार, डॉ. मुनोत जनकल्याण रक्त पेढी, अहिल्यानगर), उद्योगपती रमेश गुगळे, शांतीलाल गुगळे, उमेश देशमुख,अशोक पितळे, बापु देशपांडे, व्यापारी मोहन ढाळे, अनिल बाफना आदी मान्यवर व रक्तदाते उपस्थित होते.

गेल्या २५ वर्षांपासून आहिल्यानगर येथील जन कल्याण रक्त पेढी रक्त संकलन करत आहे आणि जामखेड मधील रक्तदाते रक्त दान शिबीरासाठी विशेष सहकार्य करत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सौ.ऐश्वर्या तनय खैरनार तसेच सूत्रसंचालन पर्यवेक्षक अनिल देडे यांनी केले तर आभारप्रदर्शन आभार माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी मानले.

Back to top button