बीड
साहित्य वाचनाने सामाजिक,सांस्कृतिक,वैचारिक जडणघडण होते-कवी संदीप जगताप

सौ.के.एस.के.महाविद्यालयात विविध भाषा वाड्.मय मंडळाचे उद्घाटन
बीड(प्रतिनिधी)ः वैचारिक सामाजिक,सांस्कृतिक जडणघडणीत साहित्य वाचन हे महत्वपूर्ण असून साहित्य वाचनामुळे माणसावर सकारात्मक संस्कार होतात.साहित्यामुळे आई, वडील,शिक्षक व जेष्ठांविषयी आदर निर्माण होतो. आदरामुळे माणसी मोठे होतात. आई हे ज्ञानाचे पहीले विद्यापीठ असते. विद्यार्थ्यांनी कान,डोळे,मेंदूची द्वारे नेहमी उघडी ठेवली पाहीजेत असे मत कवी संदीप जगताप यांनी विविध भाषा वाड्.मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी व्यकत केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ.दीपा क्षीरसागर ह्या होत्या.
यावेळी कवी संदीप जगताप यांनी मला माफ कर, तुझ्या लग्नाला येता आले नाही सुप्रसिध्द कविता सादर केली.बहीणीच्या लग्नाची शिडी बघताना या सारख्या कवितेतून बहीणीला वाटे लावताना जो प्रसंग आई,वडील,भाऊ,बहीण यांच्या भावभावना व्यक्त केली.पाऊस माळावर पडो, नाहीतर मळ्यात पडो पाणी त्यांच्याच तळ्यात जाते या कवितेमधून राजकीय लोक सामान्य कार्यकर्त्याला कसे राबवून घेतात याचे विदारक चित्रण कवितेतून व्यक्त केले आहे. कवी संदीप जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डोक्यावरचा हंडा रिकामा नको तो डळमळीत होतो यासारख्या ओव्या मधून विद्यार्थ्यांनी साहित्याचे वाचन भरपूर मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले संस्कार होतात.विद्यार्थ्यांची जडणघडण होते व विद्यार्थी संस्कारशील बनतात म्हणून ग्रंथ संकलन आवश्यक आहे. हिरव्या होणार्या मातीचा ,पाणी देणार्या नद्यांचा एकच असतो रंग तो पांडूरंग यासारख्या कवितेमधून निसर्ग व शेतकरी या विषयावर कविता सादर केल्या.
यावेळी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना डॉ.दीपा क्षीरसागर म्हणाल्या की,जीवनाचे विविध पैलू सांस्कृतिक,सामाजिक,राजकीय,संवेदनशील मनाने कवी संदीप जगताप यांनी आपल्या विविध कवितांमधून कवितांशी असणार नात व्यक्त केल आहे. गंभीरपणाने चिंतनशील,सामाजिक विषयावर या कवितेमधून भाष्य केलं आहे. शेतकरी मुलांचे प्रेम कवितेबरोबरच दुःखाची किनार व्यक्त केली आहे.आज शहरी बरोबरच ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरीकांची हेळसांड होत आहे. मुलांचे उद्बोधन झाले पाहीजे त्यांची जडणघडण चांगल्या पद्धतीने व्हावी,विद्यार्थ्यांनी लिहतं झाल पाहीजे,रागावर ताबा मिळवून जातीयवाद, धर्मवाद जोपर्यंत समाजातून संपत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही .विद्यार्थ्यांनी पुरोगामी झालं पाहीजे आज कुटुंबातील संवाद संपलेला असून समतेचा विचार आला पाहीजे.विद्यार्थ्यांनी विकासासाठी संघर्ष करावा, व्यसनापासून दूर रहावे, कष्टाने पैसो,प्रतिष्ठा मिळवून विधायक कार्य केले पाहीजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.बालासाहेब कटारे यांनी केले. या प्रसंगी मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, ऊर्दू या भाषेतील भित्तीपत्रकाचे प्रकाशन झाले. प्रा.डॉ.शंकर राऊत यांच्या बेसिक कन्सेप्टस ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन या गणित विषय ग्रंथाचे प्रकाशन तसेच डॉ.विनायक चौधरी यांचे रिझर्व्हे बँक ऑफ इंडिया आणि चलन विषयक धोरण या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनिता वैद्य तर आभार डॉ.अन्सार उल्ला खान यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी डॉ.्रसुधाकर गुट्टे, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ.अनिता शिंदे, पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक डॉ.खान ए.एस., कमवि उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा.जालिंदर कोळेकर तसेच मराठी विभागातील समिती सदस्य डॉ.आबासाहेब राठोड, डॉ.सय्यद इमाद तसेच महाविद्यालयाीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
प्राचार्य