बीड

चिंचपूर गावचे सरपंच सतीश ढवळे मेजर यांना शिव प्रतिष्ठान संस्था पुणे तर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार 2025 जाहीर

चिंचपूर गावचे सरपंच सतीश ढवळे मेजर यांना शिव प्रतिष्ठान संस्था पुणे तर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार 2025 जाहीर

*26 ऑक्टोंबर रोजी आळंदी पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार

आष्टी तालुक्यातील चिंचपुर गावचे लोकप्रिय सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते लोकनेते सुरेश आण्णा धस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे सरपंच परिषद आष्टी तालुका समन्वयक मा.सतीश ढवळे मेजर यांना शिव प्रतिष्ठान संस्था पुणे यांच्या तर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे..
“कर्तुत्ववानांचा सन्मान हा केवळ पुरस्कार नसून,तो त्यांच्या कार्यातून समाजाला मिळालेली अमूल्य प्रेरणा असते” या उक्ती प्रमाणे समाजसेवक ही अशी व्यक्ती असते जी गरजू लोकांना किंवा समुदयांना त्यांचे जीवन सुधारण्यासाठी मदत करते हे लोक नेहमी घरदार विसरून सामाजिक कार्य करत असतात याचं विचारांचे पाईक असणारे चिंचपुर गावचे विद्यमान सरपंच सतीश ढवळे मेजर यांनी गेली अनेक वर्ष केलेल्या आणि करत असलेल्या समाजसेवेची दखल घेऊन पुणे येथील अनेक वर्ष समाजभिमुख कार्य करणारी लोकप्रिय सामाजिक संस्था शिव प्रतिष्ठान या संस्थेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार 2025 जाहीर झाला असून पुरस्काराचे वितरण 26 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आळंदी देवाची पुणे या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे
सरपंच सतीश ढवळे मेजर गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उपोषण,गावात अनेक प्रकारची विकास कामे,वृक्षलागवड, श्रावण बाळ या सारख्या योजनांसाठी विशेष प्रयत्न करतात,समाजाच्या प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलने उपोषण,गोरगरीब जनता,शेतकरी विद्यार्थी यांच्या साठी नेहमी आवाज उठवतात,गावामध्ये सरकारच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे त्याच बरोबर महिलांसाठी बचत गट यांना आर्थिक साह्य मिळून देणे,आणि स्वतः सरपंच असून सुद्धा झेंडा वांदनाचा मान सैनिक कुटुंबांना देणे अशा अनेक कार्याची दखल घेऊन सरपंच सतीश ढवळे मेजर यांना शिव प्रतिष्ठान पुणे संस्था चा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Back to top button