बीड
दीप अग्रो टेडर्स कडून घेतलेले बियाणे निघाले बोगस कृषी विभागाकडून कार्यवाही नाही

दीप अग्रो टेडर्स कडून घेतलेले बियाणे निघाले बोगस कृषी विभागाकडून कार्यवाही नाही
15 ऑगस्ट रोजी शेतकरी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन
दिंद्रुड (प्रतिनिधी ) मौजे चिखली तालुका धारूर जि. बीड येथील शेतकरी सतीश नागोराव काशीद यांनी जून महिन्यात दीप अग्रो ट्रेडर्स कडून बियाणे खरेदी केली बियाण्याची पेरणी केली असता बियाणे उगवलेच नाही याची तक्रार कृषी अधिकारी धारूर यांच्याकडे केली असता त्यांनी कृषी केंद्रावर कुठलीच कारवाई केली नाही यामुळे सदर शेतकरी सतीश नागोराव काशीद यांनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे
निवेदनात सतीश नागोराव काशीद यांनी म्हटले आहे की माझी मौजे चिखली तालुका धारूर येथे माझी दहा एकर जमीन आहे सदर जमिनीची पेरणी करण्यासाठी दिनांक 12 जून 2025 रोजी मी दिंद्रुड येथील दीप ऍग्रो ट्रेडर्स कडून बियाणे खरेदी केले 21 बॅग कापूस, दोन बॅग सोयाबीन खरेदी करून सदर बियाण्याची शेत जमिनीत पेरणी केली असता दहा टक्के बियाण्याचीच उगवण झाली बाकी 90% बियाणे बोगस निघाले त्या मुळे मी हताश झालो आहे माझी उपजीवका जगण्याचे साधन एकमेव शेती आहे मागच्या वर्षी मुलीचं लग्न केल्यामुळे मी कर्जबाजारी झालो आहे त्यामुळे जीवन जगावे की मरावे असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला आहे बोगस बियाणे बाबत मी कृषी अधिकारी धारूर तहसीलदार धारूर यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र सदर अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र वाल्यालाच वाचवण्याचा प्रयत्न करून त्याला पाठीशी घालण्याचे काम केले त्यामुळे प्रशासन मला न्याय देणारच नसेल तर जगून काय फायदा म्हणून 15 ऑगस्ट रोजी मी माझे संपवून घेतो म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे असा इशारा शेतकरी सतिश नागोराव काशीद यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे तरी याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी मला न्याय देतील अशी आशाही काशीद यांनी व्यक्त केली आहे



