📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन व जिल्हा रुग्णालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न 

रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन व जिल्हा रुग्णालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

शिबिरात ६९ बालकांची  तपासणी करून २० बालकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे.

बीड प्रतिनिधी (ता. ३ ऑगस्ट): रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउन व जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य – मोफत बाल हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम व डीईआयसी अंतर्गत, सह्याद्री हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालय, बीड येथे रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण ६९ बालकांची 2-D Echo कलर डॉप्लर तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २० बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल, पुणे येथे पाठवण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

 

या शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी सर्व बालकांचे तपासणी केली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. संजय राऊत, मा. डॉ. उल्हास गंडाळ (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बीड, मा. डॉ. सचिन शेकडे , आणि निवासी वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, डीईआयसी चे बालरोगतज्ञ डॉ. अशोक भांगे,डीईआयसीसी चे मॅनेजर डॉ. सायली वानेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउनचे अध्यक्ष रो. इंजि. राहुल बोरा, सचिव डॉ. प्रकाश कोंका, तसेच अवेन्यू डायरेक्टर रो. उमाकांत थोरात व प्रोजेक्ट चेअरमन रो. डॉ. नामदेव साबळे शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे सर्व सदस्य आणि शिबिरार्थी नागरिक बालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button