महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड; ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड; ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले यांच्या हस्ते सत्कार
जामखेड (प्रतिनिधी) –महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले (नाना) यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रकाश सदाफुले, अनिल रेडे, प्रदीप शेटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांच्या निवडीमुळे कुस्ती क्षेत्राला नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया जेष्ठ नेते वैजिनाथ पोले यांनी व्यक्त केली. कुस्ती हा ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा असून, याच्या विकासासाठी आमदार रोहित पवार यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.



