बीड

विकास कामे करा, वंचित गरजू भोगवटाधारकांना घरकुल द्या! नवीदोद्दीन सिद्दिकी यांचे आ. प्रकाश सोळंके यांना निवेदन

विकास कामे करा, वंचित गरजू भोगवटाधारकांना घरकुल द्या!

नवीदोद्दीन सिद्दिकी यांचे आ. प्रकाश सोळंके यांना निवेदन

माजलगाव (प्रतिनिधी) – शहरातील वार्ड क्रमांक ८ ची विकास कामे करा व शहरातल्या वंचित गरजू भोगवटा धारकांना घरकुल द्या. अशा मागण्या समाजवादी पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष तथा बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी आ. प्रकाश सोळंके यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, माजलगाव शहरात दिनांक 28 जुलै 2025, रोजी वार्ड क्रमांक 8 मध्ये माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे यांचे नियोजित कार्यक्रमात माजलगाव शहराच्या फुकटपुरा, बरकत नगर, वडार गल्ली, इंदिरानगर, आझाद नगर, कुरेशी गल्ली, तकिया मोहल्ला,  मनुर रोड, महेबूबनगर, बिलाल मोहल्ला व सर्व भोगवटदार धारकांना घरकुल मिळावे या मागणी करिता माजलगाव नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे व माजलगाव समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्याशी माजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक 08 व इतर शहरातील सर्व मुस्लिम बहुल प्रभागांच्या विकास कामे संदर्भात सविस्तर चर्चा करून तसेच अनेक वर्षापासून मागणी करत असलेले वंचित भोगवटदार लाभार्थ्यांना घरकुल ची मंजुरी देण्याचे निवेदन दिले. निवेदन देताना  माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश आनंदगावकर, माजी नगराध्यक्ष नासर खान व राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम बापू येवले, मानसे. राहुल लंगडे, मानसे अविनाश बनसोडे, मानसे सुशांत पौड, मानसे रफिक तांबोळी, शिवसेनेचे शहराध्यक्ष पापा सोळंके, मौलाना आझाद चे नुमान चाऊस,  मोहसीन बागवान, पठाण अमजद जिलानी व अनेक मान्यवर  सहित शेकडोंच्या संख्येंने महिलांसह अन्य नागरिकही उपस्थित होते.

Back to top button