स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
जामखेड प्रतिनिधी – शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौंडेशनचे स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी प्रा.विनोद बहिर,प्रा.प्रदीप भोंडवे, प्रा. दादासाहेब मोहिते, प्रा.विवेक सातपुते, प्रा.सुनील घाडगे आदी प्राध्यापक व शिक्षकांचे गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन गुरु शिष्याची परंपरा जोपासून आज दि.१० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. छबिलाल गावित यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बारावी विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, कु.श्रेया जगताप, कु.ऐश्वर्या वटाणे, कु. पायल खैरे,कु. साक्षी पवार या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगत सांगितले की, जीवनाच्या प्रत्येक वळणावर संस्काराची,ज्ञानाची,मार्गदर्शनाची शिदोरी देणारे आई-वडील, शिक्षक हेच गुरु असतात,ज्ञान देण्याचे महत्त्वाचे कार्य गुरु करत आहेत .आपण कितीही मोठे झालो तरी गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही.तसेच कु.दादा झरे ,कु.फिजा सय्यद या विद्यार्थ्यांनी आपले इंग्रजी भाषेत उत्कृष्ट मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे मन जिंकले.
यावेळी संस्थेच्या सचिवा तथा साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ.अस्मिता जोगदंड/भोरे मॅडम, यांनी सर्व शाखेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्रांजली कांबळे हिने तर आभार प्रदर्शन कु.अंजली भोंडवे हिने मानले.



