बीड

लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना वाटलेल्या कामांच्या “रेवड्या” पैकी लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या १८५ कामांचा “श्रीगणेशा” सुद्धा झाला नाही ; मराठवाड्यात २६२८ कामांना मंजुरी, बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२१४ कामांचा समावेश तर १३३४ कामे कागदावर प्रगतिपथावर :- डॉ.गणेश ढवळे

लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना वाटलेल्या कामांच्या “रेवड्या” पैकी लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या १८५ कामांचा “श्रीगणेशा” सुद्धा झाला नाही ; मराठवाड्यात २६२८ कामांना मंजुरी, बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२१४ कामांचा समावेश तर १३३४ कामे कागदावर प्रगतिपथावर :- डॉ.गणेश ढवळे
—–
बीड:- ( दि.०२ ) ग्रामीण भागातील विकासासाठी लोकप्रतिनिधी कामे सुचवित असतात.यात २५१५,१२३८ या योजनांमधून मराठवाड्यात गतवर्षी २६२८ कामांना मंजुरी मिळाली त्यातील १३३४ कामे कागदावर प्रगतीपथावर आहेत मात्र मंजुरीनंतर कामे पूर्ण करण्याकडे लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार दोघांनीही डोकावून पाहिले नाही त्यामुळे वर्षं उलटुनही मंजुर कामांपैकी १८५ कामांसाठी उद्घाटनाचा नारळ फोडलेला नाही त्यामुळे लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना वाटलेल्या कामाच्या” रेवड्या” तशाच असुन मंजूर कामापैकी १८५ कामांचा “श्रीगणेशा” सुद्धा झालेला नसल्याचे आढळून आले आहे.आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा या कामांच्या “रेवड्या” वाटल्या जाणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उपस्थित केला असुन बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२१४ कामांचा समावेश असुन मंजूर केलेली कामे वेळेत पूर्ण होताना दिसत नाहीत त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार यांनी मंजुर कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. १५१५ आणि १२३८ या हेडखाली मंजूर झालेल्या कामांचा निधी हा वित्त विभागाकडून टप्याटप्याने दिला जातो त्यामुळे वित्तमंत्री व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.

सविस्तर माहितीस्तव

ग्रामीण भागासह शहरी भागात २५१५,१२३८ या योजनूमधुन विविध विकास कामे मंजूर केली जात असतात.यासाठी लोकप्रतिनिधींकडुन या कामांच्या शिफारशी होत असतात.लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार मंजूर केलेली कामे पुढे वेळेत पूर्ण होताना मात्र दिसत नाहीत.या कामांमध्ये गावांतर्गत सिमेंट रस्ते,नाल्या, विद्युत पथदिवे, पेव्हर ब्लॉक आणि ईतर आवश्यक कामांचा समावेश असतो.बीड जिल्ह्यात तब्बल १२१४ कामे मंजूर करण्यात आली होती.तर मराठवाड्यात गतवर्षी २६२८ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी १३३४ कामे कागदावर प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जाते तर १८५ कामांच्या उद्घाटनाचे नारळ देखील फुटलेले नाहीत.
कामाला मंजुरी मिळाल्यानंतर मात्र हेच कंत्राटदार कार्यकर्ते कामांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

जिल्हा निहाय मंजुर कामे

बीड               १२१४
परभणी           ५९९
नांदेड.             ३७३
संभाजीनगर     ३२९
हिंगोली            ७९
धाराशिव           २५
जालना             ००

ग्रामीण भागातील विकासकामे

गावातील अंतर्गत रस्ते आणि गटारांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे, स्मशानभूमी आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करणे आणि त्यांचे संरक्षण करणे, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे,शिक्षण सुविधांमध्ये सुधारणा करणे.

शहरी भागातील विकासकामे

शहरातील अंतर्गत रस्ते आणि पदपथांची दुरूस्ती, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया, सार्वजनिक उद्याने आणि क्रिडांगणे विकसित करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे, पर्यटन स्थळांचा विकास करणे, महिला आणि बालविकासाची कामे.

Back to top button