सनराईज शैक्षणिक संकुलामध्ये अहमदाबाद अपघातातील मृतांना श्रद्धांजली

सनराईज शैक्षणिक संकुलामध्ये अहमदाबाद अपघातातील मृतांना श्रद्धांजली
जामखेड प्रतिनिधी:जामखेड तालुक्यातील पाडळी येथे सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशनचे स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, व सनराईज इंग्लिश येथील विद्यार्थ्यांनी अहमदाबाद अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली, अहमदाबाद येथुन लंडन साठी जाणारे एअर इंडियाचे( Al:171) विमान गुरुवारी दिनांक 12/06/2025 दुपारी अवघ्या काही मिनिटात कोसळल्याने विमानातील 241 तर मेघाली नगर परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे 24 मिळून एकूण 265 नागरिकांचा मृत्यू आढळला होता, या दुर्घटनेत 60 वर अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले असून अपघातातील जे जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी कॉलेजमध्ये हात जोडून सामूहिक प्रार्थना करण्यात आली यावेळी, प्राचार्या अस्मिता जोगदंड, संस्थेचे संचालक तेजस (दादा) भोरे,प्रा.विनोद बहिर, प्रा.नारायण आयकर, प्रा.स्वाती पवार मॅडम, प्रा.प्रदीप भोंडवे, प्रा.दादासाहेब मोहिते, प्रा. छबिलाल गावित, प्रा. विवेक सातपुते, प्रा.सुनील घाडगे, मुख्याध्यापक विजय मनेरे, सुनील पठाडे, सुषमा भोरे, साधना दंडवते, सविता काळे, महेश पाटील, दिनकर सरगर, हनुमंत वाघमारे, बुवासाहेब दहिकर, व इतर तसेच संकुला मधील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.



