एक उत्तम प्रशासक शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगे पाटील अनंतात विलीन

एक उत्तम प्रशासक शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगे पाटील अनंतात विलीन
अहिल्या नगर/प्रशांत बाफना घरच्या अत्यंत परिस्थितीतून शाळेसाठी दररोज १० किलोमीटरची पायपीट करत कमवा आणि शिका योजनेतून कुठलाही आर्थिक हातभार नसताना महाविद्यालय शिक्षण पूर्ण करणारे आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर विविध प्रशासकीय पदे भूषवत लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची गंगा उभारणारे किमयागार म्हणजे कै. श्री. साहेबराव घाडगे पाटील. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे पाटील यांचा जन्म नेवाशाच्या तेलकुडगाव या छोट्याशा खेड्यागावात झाला. घरच्या बिकट परिस्थिती वर मात करत पुणे विद्यापीठातून एम. एस्सी फिजिक्स, कलकत्ता येथील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स मधून एम. आय. ई तर आय. आय. टी पवई येथून डी. आय. आय. टी या पदवी त्यांनी संपादन केल्या. शासनाच्या राज्य परिवहन महामंडळ, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी, भारतीय सैन्यदल, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त आदी उच्च प्रशासकीय पदांवर त्यांनी काम केले. उच्च पदावर काम करत असताना त्यांना आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी समाजातील मुलांसाठी मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था करावी ही तळमळ होती. म्हणून त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची स्थापना त्यांनी २४ नोव्हेंबर १९९५ मध्ये केली. त्रिमूर्ती पावन प्रातिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून ८ डी. एड., ५ बी. एड., १ एम.एड., ७ सिनिअर कॉलेजेस, १
लॉ कॉलेज,मराठी-इंग्रजी माध्यमाच्या १६ शाळा, १३ ज्युनिअर कॉलेजेस अशा एकंदर ५१ वसतिगृहयुक्त गुरुकुल, सैनिकी पध्दतीच्या शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये संस्थेचे ७ ठिकाणी संकुले आहेत. विदर्भा मध्ये वर्धा व धामनगाव रेल्वे येथेही संस्थेने के. जी. ते १२ वी पर्यंत शैक्षणिक शाळा व डी.एड कॉलेज सुरू केले आहेत. त्रिमूर्ती संकुलाचे पहिले रोपटे तेलकुडगाव च्या शाळेपासून सुरु झाले. तेलकुडगावच्या मातीने आजपर्यंत नामवंत, गुणवंत तसेच राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी घडवले आहेत. या गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसेवा उपलब्ध करून देण्याची घाडगे पाटील यांची तळमळ होती. संस्थेचे त्रिमूर्तीनगर नेवासा, तेलकुडगाव, ढोरजळगाव, शेवगाव, श्रीरामपूर, अहमदनगर, धामणगाव रेल्वे अमरावती या ठिकाणी सर्व सोई सुविधा युक्त शैक्षणिक संकुल आहेत. सर्व संकुले वसतिगृहयुक्त आहे. आज रोजी संस्थेमध्ये ९ हजार विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेत आहेत, तसेच १३ हजार विद्यार्थी अपडाऊन करतात. साधारणपणे २२ हजारहून अधिक विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत तर दीड हजार शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
मुलींसाठी प्रत्येक संकुलात स्वतंत्र वसतिगृह आहेत. सैनिकी शिक्षणामुळे विद्यार्थांचे आयुष्य शिस्तबद्ध व वक्तशीर बनत असून नैतिक मूल्याधिष्ठित शिक्षण, नेमबाजी, घोडेस्वारी, पॅरासीलिंग आदी खेळ मुले व मुलींसाठी उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थांचे मनोबल वाढविण्यास मदत होत आहे. सैनिकी गुणवत्ते बरोबर संस्थेमध्ये क्रीडा शिक्षणावर अधिक भर दिला जातो. सर्व खेळांसाठी राष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगणे उभारण्यावर संस्थेने भर दिलेला आहे, कारण खेळाबरोबर शारीरिक वाढीबरोबर मानसिक स्वास्थ्यही लाभते व करिअर घडविण्यासाठी विशेष मदत होते. संस्थे अंतर्गत काळाचा वेध घेऊन श्रमदानातून वृक्षरोपण व जलसंधारणांची कामेही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मिळून केली आहेत. पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार या शासनाच्या धोरणानुसार ३५ व ४५ एकरचे ६ कोटी रुपयांचे दोन पाणी साठवण तलाव श्रमदानातून उभारण्यात आले आहेत. संस्थेचा
परिसर अनेक वृक्ष व फळझाडे लावून हिरवागार केलेला आहे. ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतकर्याच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी प्रामुख्याने त्रिमूर्ति संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्रिमूर्तीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अनेक क्षेत्रामध्ये विविध पदांवर अधिकारी, डॉक्टर, इंजीनिअर व व्यवसायामध्ये यश प्राप्त केले आहे.
समाजभान राखत मुलींना फीमध्ये विशेष सवलत देऊन त्यांना शिक्षण घेण्याची संधी विशेषतः ग्रामीण मुलींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. संस्थेच्या तेलकुडगाव, ढोरजळगाव, शेवगाव व नेवासा फाटा संकुलात दरवर्षी गरजू व होतकरू साडेचारशे गरीब मुलामुलींना मोफत वसतिगृह व भोजन सुविधा देण्यात येते. अनाथ, निराधार, शहिदांची व आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या पाल्यांना संस्थेत मोफत शिक्षण दिले जाते. संस्थेच्या सहा संकुलात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये साडेचारशे मुले-मुली दत्तक योजनेअंतर्गत समाविष्ट करून त्यांना भोजन, वस्तीगृह व सर्व शिक्षण मोफत देण्यात आले आहे. तसेच संकुलात INDAWing, स्पर्धा परीक्षा केंद्र, नीट- सीईटी क्लासेसची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक वृंद व सर्व सहकारी आत्मियतेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्नशिल असल्यामुळे अतिशय कमी कालावधीमध्ये
तालुक्यासह त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या सर्व कॅम्पसमध्ये सगळीकडे शोककळा पसरली. घाडगे यांच्या निधनाबद्दलच्या या धक्कादायक बातमीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून घाडगे यांनी जिल्ह्यासह राज्यात मोठा नावलौकिक मिळविला आहे. स्वर्गीय घाडगे यांचं पार्थिव सध्या मुंबईत असून आज बुधवार (दि. ११) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सांगितले आहे. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातूनही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी घाडगे पाटील यांच्या संस्थेला प्राधान्य देत आहेत. घाडगे पाटील यांच्या कार्याची दखल राष्ट्रपती राज्यपालांसह अनेक मान्यवरांनी घेत त्यांचा गौरव केला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्युकेशन या प्रतिष्ठित संस्थेने त्यांना अजीव सदस्यत्व दिले आहे. अशा शिक्षण महर्षीस भावपूर्ण श्रद्धांजली !!
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे यांचे काल सायंकाळी निधन झाले. आज दिनांक 11 जुन वार बुधवार रोजी पार्थिवावर अंत्यसंस्कार नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती संकुल अहिल्यानगर येथे पार पडले. काल सायंकाळी नेवासे येथे निधनाचं वृत्त धडकताच नेवासे तालुक्यातल्या त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. संस्थेच्या कामा निमित्त मुंबईला मंत्रालयात गेले असता तिथंच त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली



