बीड

१२७ हेक्टर शेती क्षेत्र अवकाळी पावसाच्या पाण्यात ; प्रहार जनशक्ती पक्षाचा शासनाला अल्टीमेट

१२७ हेक्टर शेती क्षेत्र अवकाळी पावसाच्या पाण्यात ; प्रहार जनशक्ती पक्षाचा शासनाला अल्टीमेट

जामखेड : तालुक्यातील विविध भागात आलेल्या अवेळी व मुसळधार पावसामुळे फळबागा, भाजीपाला, काढणीला आलेला कांदा, टोमॅटो व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे १२७ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी आज दिनांक २८ मे २०२५ रोजी प्रहार जनशक्ती पक्ष, जामखेड तालुका यांच्या वतीने तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, प्रहार पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश राळेभात, प्रहार शेतकरी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ दौंड, अंकुश वाघ,समाधान जाधव,सागर तादगे,नितीन तादगे,तानाजी पवार, श्री भीमराव पाटील , लहू वाघ, शहाजी वाघ, विलास दौंड, बंडू उगले, सचिन उगले, मोहन भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पिकांचे, घरांचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. तालुक्याचे संपूर्ण अर्थचक्र कोलमडले असून शासनाने या आपत्तीची तातडीने दखल घ्यावी.

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून बाधित १२७ हेक्टर शेती क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

Back to top button