बीड

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे… राजेंद्र मस्के

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे… राजेंद्र मस्के

विधानसभा निवडणुकीत जे झाले ते मी विसरून गेलो आहे… महेबुब शेख

बीड प्रतिनिधी- काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या असून या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आष्टी येथे तालुका स्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीस जिप सदस्य सतीश शिंदे, प्रदेश सचिव ॲड.नरसिंह जाधव, अण्णासाहेब चौधरी, सुनील नाथ, तालुका अध्यक्ष परमेश्वर शेळके,संजय थोरवे,राम खाडे, मिसाळ पाटील, मिर्झा बेग,तांबेताई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने गर्दी केली होती.

बैठकीस संबोधित करताना राजेंद्र मस्के म्हणाले की,लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. आष्टी मतदार संघातील लोक व कार्यकर्ते शरद पवार साहेबांना मानणारा आहे. आष्टी मतदार संघात सत्ता असो अथवा नसो पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. या कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष उभा राहिला. निष्ठेने काम करून कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळवून दिला. परंतु विजय झाल्यानंतर अथवा सत्तेत गेल्यानंतर कार्यकर्त्यांचा विचार आमदारांनी केला नाही अशी खंत ही काही कार्यकर्त्यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केली.

आगामी काळातील निवडणुकांत विजय होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले. विधानसभा निवडणुकीत जे काही झाले ते सर्व मी विसरून गेलो आहे. सामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. पक्ष मजबुत करून पक्षाला विजय प्राप्त करून देण्यासाठी माझी धडपड आहे. शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात आपला पक्ष कायम जनमानसात अग्रेसर आहे. निष्ठावान व मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी ही आजची आढावा बैठक आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी  नेतृत्वाच्या मार्गदर्शना खाली काम करावं. असा सल्ला महेबूब शेख यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

Back to top button