बीड

डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

अहिल्यानगर:- द ऍड्रेस सोसायटी पुणे नाशिक हायवे मोशी याठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व समाज प्रबोधन या जयंती उत्सवातून करण्यात आले श्री नितीनदादा सस्ते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करण्यात आले
बुध्दपुजा आणि भीमपूजा बौद्धाचार्य निकाळजे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली त्यानतर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित प्रवचन देण्यात आले कु प्रज्वल विजय वाघमारे यांनी भारतीय सांविधानाचे महत्व आणि हिंदू कोड बिला विषयी सखोल माहिती दिली मिलिंद विद्यापीठ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर विषय असणारे संबंधांचे प्रबोधन करण्यात आले आयु काटे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारणे पाठीमागचा उद्देश विशेष वशील पालनाचे महत्व सांगितले तसेच बौद्धधर्माच्या दहा पारमिता सांगितल्या या पारमिता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कशा पूर्ण केले याविषयी प्रबोधनात्मक विचार मांडले त्यानंतर द ॲड्रेस सोसायटी जी विंग सेक्रेटरी श्री विजय रमेश सोनवणे यांनी आयोजित केलेला वराड निघालं लंडनला हे एक पाञी नाटक श्री नितीन आंग्रे यांनी सादर केले या नाटकासाठी ऍड्रेस सोसायटीमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे नियोजन द ऍड्रेस सोसायटी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे सदस्य दीपक पोहरे विजय वाघमारे भारत वाघमारे रत्नाकर जाधव विजय सोनवणे चव्हाणसर शिंदे सर आणि रामफळेसर तसेच महिला वर्गानी सुध्दा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता वैशाली साळवे शिरसाट(वकील) प्रेरणा शिंगोडे (शिक्षिका) पोर्णिमा पोहरे मनीषा सोनवणे प्रतिक्षा वाघमारे मृणाल जाधव यांनी केले होते या कार्यक्रमासाठी नागरिक महिला लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते

Back to top button