बीड
अनिलदादा जगताप यांच्या उपस्थितीत असंख्य तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

अनिलदादा जगताप यांच्या उपस्थितीत असंख्य तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!
एकनाथजी शिंदे सर्वसामान्यांचा आधार- अनिलदादा जगताप
बीड, प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन तथा महाराष्ट्रा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न खा. डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृवाखाली सुरु असलेल्या शिवसेनेच्या दमदार कार्यपद्धतीस प्रभावित होऊन ओबीसी व्ही जे एनटी सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबजी किसवे साहेब आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, ओबीसी व्ही जे एनटी सेना महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तथा ओबीसी व्ही जे एनटी सेना जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण, जिल्हा संघटक दगडू दादा गायकवाड यांच्या माध्यमातून अशोक दुधाळ, सूरज गायकवाड, अमित गायकवाड, शुभम आखाडे, संदेश सावंत, विशाल उबाळे, दामोदर डोळस, किशोर जाधव, भरत जाधव, सुमित जाधव, वसंत जाधव, प्रशांत दुधाळ, प्रितम दुधाळ, दिपक भराटे, महेश नेवडे, गोपाळ आखाडे, सुशील दुधाळ, औदुंबर दुधाळ, नितिन शेवाळे, दत्ता राऊत, विनोद गायकवाड, रवि दुधाळ, अविनाश कुऱ्हाडे, सोहेल गायकवाड, विनोद गायकवाड, तेजस नाळे, सोनू सुरवसे, अविष्कार दुधाळ, अनय गायकवाड, राम अंकुशे, सचिन अंकुशे, श्याम अंकुशे, प्रतिक दुधाळ, निवास रोकडे, संघर्ष डोंगरे, सौरभ राऊत, बबलू घुमरे, अतुल जगताप, शैलेश आगलावे, दीपक बोबडे यांनी काल दि. 19 रोजी दुपारी 1.00 वाजताच्या दरम्यान शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जालना रोडबीड येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, ओबीसी व्ही जे एनटी सेना जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण, जिल्हा संघटक दगडू दादा गायकवाड यांनी प्रत्येकाच्या हाती भगवा झेंडा देऊन सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते बाळासाहेबांच्या विचारांचा रथ यशस्वीपणे ओढत असून त्यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात सामान्य जनतेसाठी अनेक हितदायी योजनांची उभारणी करत स्वतःला सिद्ध केले आहे. सर्वसामान्यांसाठी त्यांनी अनेक हितदायी योजना उभारल्या. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असणारे आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची ताकद वाढवण्याकरिता आपण सर्व जाती-धर्मातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे अशा भावना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी आपल्या भाषणात मांडल्या तर अठरा पगड जातीची वज्रमुठ एकनाजी शिंदे साहेबांची ताकद वाढविण्यासाठी कामी येणार असल्याचे मत शिवसेना ओबीसी व्ही जे एनटी सेना जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण, जिल्हा संघटक दगडू दादा गायकवाड यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना, युवासेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
°°°°°



