बीड

वरिष्ठ लेखनिक सुनील वारे व सेवक विलास हुलगुंडे यांचा सन्मानपूर्वक निरोप

वरिष्ठ लेखनिक सुनील वारे व सेवक विलास हुलगुंडे यांचा सन्मानपूर्वक निरोप

रयत शिक्षण संस्थेच्या माजी सचिव यांच्या उपस्थितीत कन्या विद्यालयाचा सेवानिवृत्ती समारंभ

जामखेड प्रतिनिधी :रयत शिक्षण संस्थेचा विकास हा अशाच सामान्य सेवकांच्या योगदानावर श्रमावर आधारलेला आहे असे गौरव उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सचिव शिवाजीराव भोर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कन्या विद्यालयाचे वरिष्ठ लेखनिक सुनील वारे आणि सेवक विलास हुलगुंडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विद्यालयात कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम गुरुवार, ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता पार पडला.यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना भोर म्हणाले की,निश्चित आर्थिक स्रोत नसतानाही लोकवर्गणीच्या माध्यमातून कन्या विद्यालयाची तीन मजली इमारत उभारण्याचे स्वप्न साकार झाले. या कार्यात वरिष्ठ लेखनिक सुनील वारे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.विद्यालयाच्या विकासासाठी निधी संकलनाची जबाबदारी त्यांनी धैर्याने पेलली. शाळा समिती, मुख्याध्यापिका, शिक्षक आणि समाजातील घटकांमध्ये समन्वय साधत त्यांनी संस्थेच्या आर्थिक मदतीतून व लोकवर्गणीद्वारे शाळेची इमारत उभारली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव भोर (माजी सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा) होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र कोठारी (उत्तर विभागीय सल्लागार सदस्य), ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, तसेच स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, कुंडल राळेभात,भानुदास नेटके,श्री नागेश विद्यालयाचे प्राचार्य भगवान मडके, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी भोर, पर्यवेक्षक संजय हजारे,माजी मुख्याध्यापिका कुसुम चौधरी, माजी प्राचार्य अंगद काकडे, माजी पर्यवेक्षक प्रकाश सोनवणे,दिलीप खंडागळे,अभंग रेवणनाथ,वरडुळे भारत,संजय देशमाने, सुखदेव बर्गे , भाऊसाहेब खोसे,ढवळे डी.आर, विजय पाटील,नगरसेवक मोहन पवार, विद्याताई वाव्हळ, मुख्तार सय्यद,प्रा. कैलास वायकर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की,रयत शिक्षण संस्थेत वरिष्ठ लेखनिक सुनील वारे आणि सेवक विलास हुलगुंडे यांनी निष्ठेने सेवा बजावत प्रशासनाला खंबीर साथ दिली. संस्थेच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. “रयत संस्थेशी जोडलेली नाळ कधीही तुटत नाही.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते सुरेश भोसले म्हणाले, “वरिष्ठ लेखनिक सुनील वारे यांनी प्रशासनाच्या चौकटीत राहून आदर्श कार्यपद्धती ठेवली. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनिक कामकाज अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध झाले. जबाबदारीचे भान, प्रामाणिकता आणि शिस्तबद्ध कार्यप्रणाली यामुळे त्यांनी आपल्या पदावर उत्कृष्ट कार्य केले.”

कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी भोर तसेच माजी मुख्याध्यापिका श्रीमती कुसुम चौधरी यांनी वरिष्ठ लेखनिक सुनील वारे व सेवक विलास हुलगुंडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पर्यवेक्षक संजय हजारे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, “संस्थेच्या उत्कर्षात मोलाचे योगदान देणारे व सेवेत निष्ठा राखणारे वरिष्ठ लेखनिक सुनील वारे यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय सेवा बजावली. तसेच शिपाई पदावर कार्यरत राहून विलास हुलगुंडे यांनी प्रामाणिक सेवा दिली आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांच्या या समर्पित सेवेसाठी आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
यावेळी बोलताना सुनील वारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले,”आज माझ्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने गुरू आणि वडीलधाऱ्यांची उपस्थिती ही माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. माझ्या कारकिर्दीत स्कूल कमिटीने खंबीर पाठिंबा दिला आणि कन्या विद्यालय माझ्यासाठी कुटुंबासारखे राहिले,”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कन्या विद्यालयाचे भुषण गडगुले, मोहन यादव , बाबासाहेब आंधळे, सुग्रीव ठाकरे, अशोक घोडके ,श्रीमती अर्चना शिंदे, श्रीम.विशाखा ससाणे ,श्रीम.मिरा साळुंखे,स्वाती लोंढे ,श्रीम. भारती गायकवाड,श्रीम.सपना साठे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर व प्रशांत पोकळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शंभूदेव बडे यांनी मानले.

Back to top button