बीड

जामखेडच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वात डॉ. भगवान मुरुमकर यांची प्रभावी नियुक्ती!

जामखेडच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वात डॉ. भगवान मुरुमकर यांची प्रभावी नियुक्ती!

जामखेड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी हक्कांसाठी लढणाऱ्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ जामखेड आगार कार्यकारिणीच्या प्रमुख मार्गदर्शक व सल्लागारपदी डॉ भगवान मुरूमकर यांची नियुक्ती दि.१८ मार्च २०२५ रोजी करण्यात आली आहे.

ही नियुक्ती संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यात संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळावे यासाठी त्यांनी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवीन नियुक्त मार्गदर्शक व सल्लागार डॉ भगवान मुरूमकर यांनी आपल्या मनोगतात, “कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कल्याण हेच आमचे ध्येय राहील. संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याचा आवाज अधिक ताकदीने मांडला जाईल,” सभापती प्रा.राम शिंदे (विधान परिषद महाराष्ट्र राज्य) व संघटनेचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर,आ.सदाशिव रामचंद्र खोत(मुख्य कार्याध्यक्ष),सतिश संदिपान मेटकरी(सरचिटणीस),गणेश तुकाराम खटके( राज्य कार्यकारिणी सदस्य)मार्गदर्शन घेणार आहे.तसेच संघटनेचे जामखेड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन काम करु असे डॉ भगवान मुरूमकर यांनी सांगितले.

Back to top button