बीड

आजच्या स्त्रियांनी जबाबदारी व बंधने पाळावीत – प्रणालीताई कुलकर्णी

आजच्या स्त्रियांनी जबाबदारी व बंधने पाळावीत – प्रणालीताई कुलकर्णी

माहिला शिवजन्मोत्सव समिती च्या कार्याचे मान्यवरांकडून कौतुक

नाट्यछटा व सांस्कृतिक कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी – दि.१६ईश्वराने दिलेल्या जबाबदारी व बंधने आजच्या स्त्रियांनी पाळावीत.अहिल्यादेवींच्या सामाजिक कार्याचा वसा रोहिणीताई काशिद या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सक्षमपणे चालवत आहेत. महिलांनी फक्त चूल आणि मुल न पाहता आपल्या मुलाच्या करिअर कडे लक्ष द्यावे.असे प्रतिपादन प्रणालीताई कुलकर्णी यांनी केले.
माहिला शिवजन्मोत्सव समिती आयोजित शिवजयंती निमित्त दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७ वा.नाट्यछटा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होत्या.कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन माता भगिनींच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रणाली कुलकर्णी होत्या तर प्रमुख पाहुणे सरपंच रितुताई काशिद,सुरेखा सदाफुले,माहिला शिवजन्मोत्सव समिती च्या अध्यक्षा रोहिणीताई संजय काशिद,मिनाताई बेलेकर,सुनिताताई बोराटे,कांचनताई दाहितोंडे, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय काशिद,संतोष गव्हाळे, लेखक एकनाथ चव्हाण,वैद्यकीय अधिक्षक डॉ शशांक शिंदे,कॅप्टन लक्ष्मण भोरे, शंभुसुर्य मर्दानी आखाडा चे अध्यक्ष बबलू टेकाळे,संतोष मोहळकर, संतोष भोंडवे,सुरज काळे (राजमुद्रा युवा मंच), महादेव मत्रे(मुकादम ), किशोर काळे,दिपक सुरसे,शरद शिरसाट सर, जितेंद्र आढाव,अजय गौड,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर म्हणाले की,विविध सामाजिक कार्यक्रम घेत माहिला शिवजन्मोत्सव समिती ने राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम नाटाछटा या स्पर्धेत मर्दानी ग्रुप ,एकलव्य, जिजाऊ ग्रुप,विस्डम इंग्लिश मिडीयम स्कूल,छावा ग्रुप लोकमान्य शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महादेव गल्ली, जगदंबा ग्रुप, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खुरदैठण, स्वराज कन्या,तांडव ग्रुप, सोनिया पाटील,जे.के.डी ग्रुप, शिवगर्जना ग्रुप, लिटिल स्टार ग्रुप, खर्डा, कन्या विद्यालय, जामखेड, अहिल्या ग्रुप असे १६ ग्रुप यांनी सहभाग नोंदवला असून जामखेड तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैयक्तिक कलामंच यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी झाले. यामध्ये समुह ग्रुप, एकांकिका,लघु नाट्य यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.सर्वांच्या काळजाचा ठाव घेणारे “छावा” हे नाटक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून मुकुंदराज सातपुते,दिपक तुपेरे, अविनाश बोधले,शिवगंगा मत्रे आदींनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत महाराज निकम तर आभारप्रदर्शन केशवराज कोल्हे यांनी मानले.

Back to top button