साहित्य नसेल तर आपले आयुष्य नीरस व निरर्थक – प्रा.राम शिंदे

साहित्य नसेल तर आपले आयुष्य नीरस व निरर्थक – प्रा.राम शिंदे
जामखेड येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संपन्न
जामखेड प्रतिनिधी;-साहित्य आणि समाज यांचे नाते अतूट
आहे. साहित्य नसेल, कथा, कविता, नाटक, लोकगीते नसतील, तर आपले आयुष्य किती नीरस आणि निरर्थक होईल, याची कल्पनाही करू शकत नाही.ग्रामीण जीवनाचे वास्तव साकारणाऱ्या साहित्य निर्मितीमुळे समकालीन सामाजिक प्रश्न, लोकजीवन, लोकसंस्कृती, निसर्ग सौंदर्य, शेतीचे प्रश्न, पुनर्वसनाची समस्या, असे अनेक विषय समाजासमोर येऊ शकतात. राज्यस्तरीय साहित्य संमेलनासारख्या उपक्रमांमुळे नव्या दमाच्या लेखकांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
जामखेड येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन गुरुवारी शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कविवर्य प्रा. आ. य. पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व मराठी साहित्य प्रतिष्ठान या संमेलनाचे आयोजन करण्यात येते.सकाळी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे पुजन करण्यात आले.ढोल- ताशा,झांज पथक व फटाक्यांच्या आतीषबाजीत भव्य दिव्य शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.तसेच विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा.राम शिंदे,संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मेठे व मान्यवरांच्या उपस्थित दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मेठे म्हणाले की,साहित्यिक व कवी यांनी सडेतोड लिखाण करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या पाहिजेत, शेतीचे विविध प्रश्न, शेतमालाला हमीभाव यासह समाज प्रबोधनाचे लिखाण व्हायला हवे.
यावेळी स्वागताध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, डॉ. राजेश गायकवाड, गीतकार बाबासाहेब सौदागर आदींचीही भाषणे झाली.
यावेळी संमलेनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, स्वागताध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, उपाध्यक्षा डॉ विद्या काशिद, सचिव डॉ शत्रुघ्न कदम, डॉ जतीनबोस काजळे,प्रा.कुंडल राळेभात, कार्याध्यक्ष अवधूत पवार,प्रसिद्ध गीतकार बाबासाहेब सौदागर,डॉ. किसन माने, डॉ. चिन्मय घैसास, प्रकाश होळकर, डॉ. राजेश गायकवाड , प्राचार्य बाळासाहेब पारखे,विजया नलावडे , गुलाब जांभळे,माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, सभापती शरद कार्ले,डॉ कल्याण काशिद, मुकुंद सातपुते,कॅप्टन लक्ष्मण भोरे, नगरसेवक मोहन पवार, डॉ संजय राऊत, डॉ संजय भोरे,संजय काशिद,नगरसेवक दिगंबर चव्हाण, गुलशन अंधारे, अझहर काझी,प्रा.लक्ष्मण ढेपे,पवन राळेभात, बाजीराव गोपाळघरे,अमित जाधव, मुख्तार सय्यद,जयसिंग उगले, राहुल उगले,नय्युम सुभेदार, विष्णू गंभीरे, प्रविण बोलभट,उध्दव हुलगुंडे,गफ्फार पठाण,हभप बाळासाहेब गाडे (महाराज), महावीर बाफना,पिंटूशेठ बोरा आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंगनाथ राळेभात, आबासाहेब वीर,एकनाथ चव्हाण, मिनाताई राळेभात,अनिल अष्टेकर,मोहन डूचे,गोकुळ गायकवाड, मारुती काळदाते, विनायक राऊत, नितीन ढेरे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हभप हनुमंत महाराज निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ शत्रुघ्न कदम यांनी मानले.
चौकट
दिवंगत लेखक आ. य. पवार यांच्या आठवणी
लेखक, कवी, मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. य. पवार यांचे गत डिसेंबर २०२४ मध्ये निधन झाले. त्यांच्या विज्ञान कविता आणि काव्यसंग्रह विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहेत. मराठी साहित्याविषयीची त्यांची तळमळ मोठी होती. मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्ष कवी संमेलन, साहित्य संमेलने घेतली. समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा ते पुरस्कार देऊन गौरवित. त्यांच्या आठवणींना साहित्य संमेलनात अनेक साहित्यिक, वक्त्यांनी उजाळा दिला.



