📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जायकवाडीच हक्काचं पाणी सिंधफनेत सोडा:- मिठे, आमटे 

जायकवाडीच हक्काचं पाणी सिंधफनेत सोडा:- मिठे, आमटे
उद्या नाथापूर महाबैठकीस शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे
बीड (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्राने नेहमीच मराठवाड्यावर अन्याय केला मराठवाड्याचा हक्काचा पाणी पश्चिम महाराष्ट्राने पळवलं. आज एवढा भयान दुष्काळ पडला आहे याचे मुख्य कारण मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्याला मिळालेले नाही मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्याला द्यावे जायकवाडीचे पाणी सिंदफणा नदीत सोडा असे आवाहन नागेश मिठे व राजेंद्र आमटे यांनी केले.
     दर तीन वर्षांनी मराठवाड्याला भयान दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या भयान दुष्काळा मागचं मुख्य कारण म्हणजे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळाला नाही मराठवाड्यामध्ये सिंचन प्रकल्प झाले नाही मराठवाड्याच्या हक्कच पाणी पश्चिम महाराष्ट्र व इतर ठिकाणी पळवण्यात आलं यामुळे 140 गावातील लोकलढा आंदोलन यांच्या माध्यमातून गेली तीन वर्षापासून पाण्यासाठी चळवळ उभी केली जात आहे लोकलढा आंदोलनाची हक्काच्या माघण्याकरिता महाबैठकीचे आयोजन उद्या 27 ऑक्टोबर मंगळवारी सकाळी 11 वाजता हनुमान मंदिर नाथापूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी कसे मिळवायचे ?, पाण्यासाठी कशा लढा उभा करायचा ? आंदोलन आणि आंदोलनाच्या पुढील दिशा ठरवण्याकरिता महा शेतकरी बैठकीच्या आयोजन करण्यात आलेले आहे तरी या बैठकीस नाथापूर व 140 गावातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नागेश मिठे व राजेंद्र आमटे यांनी केले
Back to top button