
अखेर आंदोलनाची दखल रायंदर शेंगर यांनी घेतली
बीड प्रतिनिधी : एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी सीओईपी येथील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्याप्रकरणी पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंदार गोंजारी यांच्यावरील अन्यायकारक पोलिस कारवाईच्या निषेधार्थ व पत्रकारांवरील दडपशाहीच्या निषेधार्थ तातडीने गुन्हा मागे घेण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी निदर्शने करण्यात आली. यावेळी उपोषण स्थळी रायंदर एस.बी. शेंगर यांनी पोलीस उपनिरीक्षक वेशात सोंग घेऊन भेट घेत मागण्यांचे निवेदन स्वीकारून शासन दरबारी आपल्या मागण्या मांडण्याची ग्वाही त्यांनी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, अशोक येडे, सादेक इनामदार, हनुमान घोडके, रामधन जमाले, बाळासाहेब मोरे, शेषेराव वीर, बाजीराव ढाकणे, प्रवीण आनेराव, जयसिंगराजे वीर, आण्णासाहेब मातकरआदींची उपस्थिती होती.



