बीड

विलास घुलेच्या मृत्यूची घटना दुर्दैवी ; कसल्याही दडपणाशिवाय तपास करा

विलास घुलेच्या मृत्यूची घटना दुर्दैवी ; कसल्याही दडपणाशिवाय तपास करा

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांना सूचना*

बीड दि. २३ —
केज तालुक्यातील टाकळी – कदमवाडी परिसरात नुकत्याच झालेल्या विलास घुले या तरूणाच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आहे. पोलिसांनी कसल्याही दडपणाला बळी न पडता दोषींवर कडक कारवाई करावी, अशी सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांना केली आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांनी या घटनेबाबत पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी विस्तृत चर्चा करून माहिती घेतली आहे. या घटनेवर बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या माहितीनुसार भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारणं, इतकं की त्याचा मृत्यू व्हावा हे अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेत विलास घुले या तरूणाला काहीही संबंध नसताना हकनाक मृत्यू स्वीकारावा लागला आहे. हे  सर्व अस्वस्थ करणारं आहे. यासंदर्भात मी एसपी कावत यांच्याशी सविस्तर बोलले आहे, त्यांनी योग्य तपास करावा. मृत  तरुणाच्या परिवाराने ही विश्वास  दाखवून सहयोग करावा.  त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करावे.. तेच योग्य आहे. मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेन. योग्य न्यायासाठी आम्ही पाठिशी आहोत असे ना.पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.
••••

Back to top button