बीड

चकलांबा पोलिसांच्या साक्षीने राक्षसभुवन येथील बोगस घरकुल वाळू वाटप?

चकलांबा पोलिसांच्या साक्षीने राक्षसभुवन येथील बोगस घरकुल वाळू वाटप?
गंभीर आरोप; मात्र संबंधित पोलिसांची साधी चौकशीही नाही
गेवराई (प्रतिनिधी) राक्षसभुवन परिसरात चर्चेत असलेल्या कथित बोगस घरकुल वाटप प्रकरणात अनेक गंभीर आरोप होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून अद्याप ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. या प्रकरणात चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडामोडी झाल्याचा आरोप होत असून, काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत किंवा साक्षीने व्यवहार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
विशेष म्हणजे, महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याचे सांगितले जात असले तरी, या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची अद्याप साधी चौकशीदेखील करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे चौकशी प्रक्रियेत दुहेरी निकष लावले जात आहेत का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, मग तो कोणत्याही विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी असो, कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
चौकट :
“महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई, पण पोलिसांची चौकशी कधी?”
राक्षसभुवन येथील कथित बोगस घरकुल वाटप प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रकरणाशी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचीही स्वतंत्र चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
Back to top button