राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा. विकी घायतडक सन्मानित

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा. विकी घायतडक सन्मानित
जामखेड, दि. १४ : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ग्लोबल एलीट मीडिया अँड टेक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ जामखेड येथील दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. विकी धर्मेंद्र घायतडक यांना प्रदान करण्यात आला आहे.
सिम्बॉयसिस इंटरनॅशनल, पुणे येथे आयोजित विशेष समारंभात ग्लोबल एलीट इंटरनॅशनलच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रवीण नितीनवरे (डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज), मनोज हंबर्डे (एमआयटी), प्रेमेंद्र बनसोड (जी. एच. रायसोनी, वाघोली), बाबासाहेब दिघे (रेड चिली मीडिया), अजय बोरकर (वाडिया इन्स्टिट्यूट, पुणे), तपोपत (डी. वाय. पाटील) तसेच अशोक महाराज पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा. घायतडक यांच्या या सन्मानामुळे जामखेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबविलेले उपक्रम तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेले नेतृत्व याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. घायतडक यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिशा मिळाली असून संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
प्रा. घायतडक यांना प्राप्त झालेला हा सन्मान जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
प्रा. विकी धर्मेंद्र घायतडक यांचा परिचय व गौरव :
———————————————————-
शिक्षण : बी.ई. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, एम.ई. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग
१) अध्यक्ष – पिपल्स वेल्फेअर फाउंडेशन
२) शिक्षा भूषण पुरस्कार – २०२४
३) समाज भूषण पुरस्कार – २०२२
४) आदर्श अभियंता पुरस्कार – २०२१
५) टीचर्स इनोव्हेशन अवॉर्ड, दिल्ली – २०१९
६) धम्म पुरस्कार – २०१२
७) प्राचार्य – डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी
८) नगरसेवक – जामखेड नगरपरिषद, जामखेड
शैक्षणिक, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ हा त्यांच्या कार्याचा आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.



